नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही रामसुब्रमण्यम (V Ramasubramaniam) यांची सोमवारी २३ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग NHRC चे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे प्रमुख म्हणून रोहिंटन नरिमन यांची नियुक्ती न झाल्याने काँग्रेसनेही आपली नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणाचे पत्र आता समोर आले आहे.
या समितीत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांसह संसदेच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते आणि राज्यसभेचे उपसभापती आहेत. या समितीच्या बैठकीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे प्रमुख आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी रोहिंटन नरिमन यांच्या नावाची बाजू मांडली होती. मात्र १८ डिसेंबर २०२४ रोजी या झालेल्या बैठकीत संसद भवनात झालेल्या बैठकीत न्यायमूर्ती रोहिंगटन नरिमन यांच्या नावावर एकमत न झाल्याने राहुल गांधी आणि खर्गे यांनी असहमती दर्शवली. संबंधित नोटीशीत त्यांनी म्हटले की, त्यांना न्यायमूर्ती फली नरिमन यांना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे प्रमुख बनवायचे होते कारण ते अल्पसंख्यांक पारशी समुदायाचे आहेत.
फली नरिमन यांनी अलीकडेच जस्टिस एएम अहमदी यांच्या एका भाषणात हिंदूंबद्दल अनेक असभ्य वर्तन करण्यात आले. त्यांनी अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराबाबत बेताल वक्तव्य केले होते. त्यांनी १९८४ साली राम मंदिर बांधण्याची विश्व हिंदू परिषदेची माहिती हुकूमशाही आणि जुलमी असल्याचे म्हटले होते. ते म्हणाले की, राम मंदिराच्या बाबतीत हिंदूंची बाजू नेहमीच कायद्याविरोधात असल्याचे घोषित केले गेले. एवढेच नाहीतर त्यांनी बाबरी मशीद पाडल्यानंतर आता पुन्हा एकदा बाबरी मशीद बांधावी असेही वक्तव्य केले होते.
तसेच रोहिंटन यांचे वडील फली नरिमन यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अर्थातच रोहिंटन आणि फली नरिमन हे दोघेही अनेकदा बेताल वक्तव्य करताना दिसतात.