नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती (निवृत्त) व्ही. रामसुब्रमण्यन यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (एमएचआरसी) चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच, प्रियांक कानुंगो आणि न्यायमूर्ती (निवृत्त) विद्युत रंजन सारंगी यांची आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अधिकार्यांनी सोमवार, दि. २३ डिसेंबर रोजी ही माहिती दिली. न्यायमूर्ती (निवृत्त) अरुण कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर एमएचआरसी प्रमुखाचे पद रिक्त होते. रामसुब्रमण्यम यांच्या नियुक्तीमुळे आयोगाला नवे नेतृत्व मिळाले आहे, जे मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी काम करेल. रामसुब्रमण्यन यांची सर्वोच्च न्यायालयातील ( Supreme Court ) न्यायाधीश म्हणून प्रदीर्घ कारकीर्द आहे. त्यांना न्यायव्यवस्थेचा सखोल अनुभव आहे, ज्यामुळे त्यांना एमएचआरसीचे अध्यक्ष म्हणून आव्हानात्मक कार्ये पार पाडण्यात मदत होऊ शकते.