निष्ठावंत म्हणणाऱ्यांनी शिंदे यांना पूर्णपणे गाफील ठेवले होते : आमदार किरण सामंत

24 Dec 2024 13:21:13

KIRAN SAMANT
 
मुंबई : (MLA Kiran Samant) शिवसेना आमदार किरण सामंत यांनी नाव न घेता उबाठा नेते तसेच माजी आमदार राजन साळवी यांच्यावर आरोप केला आहे. निष्ठावंत म्हणणाऱ्यांनी शिंदे यांना गाफील ठेवलं होतं, ठाकरे गटातून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार होते नंतर माघार घेतली, असा आरोप किरण सामंत यांनी केला आहे.
 
 
"निष्ठावंत म्हणणाऱ्यांनी शिंदे यांना गाफील ठेवलं होतं"
 
या विधानसभा निवडणुकांमध्ये निष्ठावंत निष्ठावंत म्हणणारे होते, त्यांनी पूर्णपणे एकनाथ शिंदेंना गाफील ठेवलं होतं. त्यांनी लोकसभा निवडणुकांवेळी सांगितलं की तुमच्या पक्षात प्रवेश करणार आणि ऐनवेळी सांगितलं की पक्षप्रवेश करता येणं शक्य नाही. त्यामागचं खरं कारण असं होतं की त्यांना अपेक्षित होतं तिकीट मिळावं, तसं त्यांना ते तिकीट मिळालंच होतं. त्यामुळं महाविकास आघाडीचे सरकार येणार, मी या राज्याचा मंत्री आणि पालक मंत्री होणार असे ते लोकांना गाजर दाखवत होते.
 
यंदा २०२४च्या विधानसभा निवडणुकीत राजापूर विधानसभा मतदारसंघातून तीन टर्म आमदार राहिलेले ठाकरे गटाचे राजन साळवी यांचा शिंदेंच्या शिवसेनेतील किरण सामंत यांनी पराभव केला होता.
 
 
Powered By Sangraha 9.0