संभल, वाराणसी, अलिगढनंतर अमेठीमध्ये सापडले १२० वर्षे जुने मंदिर

24 Dec 2024 13:59:26
Amethi Old Temple

लखनौ : उत्तरप्रदेशमधील संभल, वाराणसी, अलिगढ आणि बुलंदशहरानंतर अमेठी येथे एक शिवमंदिर ( Amethi Old Temple ) सापडले आहे. मुसाफीरखाना पोलिसठाण्याच्या हद्दीत औरंगाबाद गावात हे मंदिर आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हे मंदिर १२० वर्षे जुने आहे. या मंदिरावर अल्पसंख्याकांनी बेकायदेशीर कब्जा केला असून, गेली २० वर्षे तेथील पूजा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सोमवार दि. २३ डिसेंबर रोजी भाजप जिल्हा सरचिटणीस अतुल सिंह यांनी एसडीएमकडे कारवाई करण्यासाठी तक्रारपत्र दिले आहे.

ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार या मंदिराची स्थापना १२० वर्षांपूर्वी एका दलित कुटुंबाने केली आहे. त्यानंतर हे मंदिर त्या परिसरातील लोकांचे श्रद्धास्थान बनले आहे. या मंदिराला लोक आपले केंद्रस्थान मानत आहेत. परंतु गेल्या काही वर्षांपासून या मंदिरात हिंदूंना पूजा-अर्चना करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामुळे अनेक लोक नाराजी व्यक्त करीत आहेत. यासंबंधी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अतुल सिंह यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी एसडीएम प्रिती तिवारी यांना तक्रारपत्र दिले आहे. या पत्रातून त्यांनी यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या तक्रार पत्राची दखल घेतल्यावर या प्रकरणाचा तपास तहसीलदारांकडे सोपवण्यात आला आहे. तपास अहवाल समोर आल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे एसडीएम प्रिती तिवारी यांनी सांगितले आहे.

Powered By Sangraha 9.0