रणवीर सिंह-दीपिका पादुकोणने दाखवला ‘दुआ’चा चेहरा, ‘या’ खास लोकांसाठी ठेवली विशेष पार्टी

24 Dec 2024 16:19:52
deepveer 
 
 
मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांना काही महिन्यांपूर्वी कन्यारत्न प्राप्त झाले. दुआ असे पालकांनी आपल्या मुलीचे नाव ठेवले. काही दिवसांपूर्वी दुआ पादुकोण सिंहच्या जन्मानंतर पहिल्यांदाच दीपिका पंजाबी गायक दिलजीत सिंहच्या गाण्याच्या कॉन्सर्टमध्ये दिसली होती. तर आता रणवीर आणि दीपिकाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्यात त्यांनी मीडियामधील काही खास व्यक्तींना आपल्या घरी पार्टीसाठी बोलावले होते आणि त्यांना दुआची पहिली झलक देखील त्यांनी दाखवली.
 
 

deepveer 
 
दीपिका आणि रणवीर यांनी लेकीचा चेहरा अद्याप रिव्हील केलेला नाही. पण नुकत्याच एका पार्टीचे आयोजन करुन दीपिका आणि रणवीर यांनी त्यांच्या लाडक्या लेकीचा चेहरा काही खास लोकांना दाखवला. शिवाय, इतर कलाकार जोड्यांप्रमाणेच रणवीर-दीपिकानेही आपल्या बाळाचे फोटो न काढण्याची विनंती पापाराझींना केली. रणवीर सिंहच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास रणवीर डॉन ३, सिंबा २, या चित्रपटात दिसणार आहे.
Powered By Sangraha 9.0