लखनौ : समाजवादी पक्षाचे नेते सुरेश यादव यांनी भारतीय जनता पक्षावर टीका करताना, हा पक्ष म्हणजे हिंदू दहशतवादी संघटना असल्याचे बेताल वक्तव्यं केले होते. गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात नियोजीत केलेल्या आंदोलनात त्यांनी हे वक्तव्यं केले होते. यादव यांच्यावर जेव्हा माध्यमांमधून टीकेची झोड उठली, तेव्हा यादव यांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केला.
२१ डिसेंबरो रोजी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने उत्तर प्रदेशच्या बराबांकी येथे अमित शाह यांच्या वक्त्व्याचा विपर्यास करत, आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनादरम्यान सपाच्या सुरेश यादव यांनी भाजपविरोधी गरळ ओकली. भाजपवर टीका करताना यादव म्हणाले की यांना या देशातील लोकशाही संपवायची आहे. त्यांचे संपूर्ण वक्तव्यं समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. भाजपने यादव यांचा वक्तव्याचा निषेध केला. त्याच बरोबर समाजवादी पक्षा हिंदू विरोधी प्रचार करत असल्याचा दावा केला.
वादाच्या भोवऱ्यात असलेला नेता
उत्तर प्रदेशच्या बाराबंकी मतदारसंघाचे नेते सुरेश यादव, असंख्यवेळा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय असणारे यादव यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अनेक वेळा कोर्टाची पायरी चढावी लागली आहे. यादव यांच्या भावाला आणि त्यांच्या भाच्याला पोलिसांनी अटक केली होती. अशा कायदेशीर आणि वैयक्तिक वादांमुळे
अनेकदा यादव कुटुंब चर्चेत राहिले आहे.