जय साईराम! नववर्षाच्या पूर्वसंध्येला रात्रभर खुले रहाणार शिर्डी साईमंदिर

23 Dec 2024 14:53:14
Shirdi Sai Mandir

अहिल्यानगर : शिर्डीतील साईमंदिर ( Shirdi Sai Mandir ) ३१ डिसेंबर २०२४ रोजी रात्रभर खुले राहणार आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात मंदिर परिसरात फटाके आणि वाद्य वाजवायला बंदी करण्यात आली आहे. यावेळी भाविकांसाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

काही दिवसात २०२५ या इंग्रजी नववर्षाची म्हणजेच ग्रेगेरियन वर्षाची सुरुवात होणार आहे. या निमित्ताने अनेक भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. आपला वर्षाचा पहिला दिवस साईबाबांच्या चरणी मस्तक ठेवून सुरु करावा अशी भाविकांची ईच्छा असते. या नवीन वर्षाच्या स्वागतार्थ अहमदनगरमधील शिर्डी, साई मंदिर देवस्थानाने ३१ डिसेंबरला मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

यादरम्यान मंदिराच्या नियमात थोडे बदल करण्यात येणार आहेत. ३१ डिसेंबरच्या रात्रीची शेज आरती आणि १ जानेवारीच्या पहाटेची काकड आरती होणार नाही. तसेच २५ डिसेंबरपासून १ जानेवारीपर्यंत वाहनपूजादेखील बंद राहणार आहे. याचसंदर्भात भाविकांसाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यामुळे साईबाबांचे दर्शन घेणे भाविकांना सोयीचे होणार आहे.

Powered By Sangraha 9.0