'भावनिक थकवा’ हा ‘बर्नआऊट’चा केंद्रबिंदू आहे. जेव्हा तुमचे भावनिक स्रोत अवघड परिस्थितींशी तोंड देण्यासाठी वापरले जातात, उदाहरणार्थ जास्त मागणी, संघर्ष किंवा कामावर किंवा घरी आधाराचा अभाव, तेव्हा तुमची स्वतःबद्दलची हितकारक भावना आणि स्वतःची आणि इतरांची काळजी घेण्याची क्षमता आपसुकच कमी होते.
संशोधनातून असे दिसून आले आहे की, भावनिक थकवा असलेल्या लोकांना कामाच्या ठिकाणी संघर्षाचे प्रमाण अधिक दिसून येते. दिवस संपताना कुटुंब आणि मित्रांशी संवाद साधण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी सहनशीलताच नसल्याचे आढळून येते आणि ते अधिक चिडचिडे व निराश होतात. ही समस्या ‘कोविड-19’ संकटामुळे अधिक गहिरी झाली आहे. केवळ कामाच्या ठिकाणीच नव्हे, तर घरून काम करणार्यांसाठीदेखील, बाहेरील मदतीशिवाय वैयक्तिक जबाबदार्या संतुलित करताना कठीण जाते. यामुळे त्यांना अपराधीपणाची आणि नुकसानीची भावना येऊ शकते.
‘भावनिक थकवा’ लक्षणीय आव्हाने निर्माण करू शकतो, परंतु तो बरा होणे शक्य आहे. त्यातून बाहेर येण्यासाठी जीवनशैलीतील बदल आणि थेरपीचे व्यवस्थित संयोजन करणे देखील तितकेच गरजेचे असते. काही व्यक्तींना शारीरिक किंवा मानसिक आरोग्य स्थितींवर उपचार करण्यासाठी औषधे किंवा इतर वैद्यकीय हस्तक्षेपांचीदेखील आवश्यकता भासू शकते. ‘भावनिक थकवा’ रोखण्यासाठी साधारणपणे तीन पद्धतींचे नियोजन आवश्यक आहे. तुमच्या भावनिक संसाधनांवरील निचरा कमी करणे, शक्य आहे तितके त्यांचे जतन करणे आणि वेळोवेळी भावनिक स्रोत नियमितपणे पुन्हा भरणे. कल्पना करा की, तुमच्याकडे अंतर्गत इंधन टाकीतील इंधन काही परिस्थितीमुळे लवकर जळते. जसे की खराब हवामान, खडबडीत भूभाग किंवा वेगाने वेग वाढवणे आणि ब्रेक लावणे, यांमुळे रस्त्यावरील सामान्य परिस्थितीपेक्षा जास्त वेगाने पेट्रोल वापरावे लागते. इंधन कमी पडू नये, याची खात्री करण्यासाठी तुम्हाला कठीण परिस्थितीचा सामना कमी करायचा आहे, अधिक कार्यक्षमतेने गाडी चालवायची आहे आणि नियमितपणे इंधन भरण्याची खात्री करायची आहे.
भावनिक संसाधनांचा वापर कमी करण्याचे पहिले पाऊल म्हणजे, तुम्हाला थकवणार्या परिस्थिती (उदा. अवघड परिस्थिती, कामे आणि व्यवसाय, नातेसंबंध) ओळखणे, नंतर त्यांच्याशी तुमचा संपर्क मर्यादित करणे.
पुढचे पाऊल म्हणजे, भावना नियमन तंत्रांसह अधिक भावनिक कार्यक्षमतेने कसे कार्य करावे, हे शिकणे. जसे की, तुमच्या भावना ओळखणे आणि स्वीकारणे आणि तणावपूर्ण अनुभवांचे पुनर्मूल्यांकन करणे. पहिले पाऊल म्हणजे, आपल्या स्वतःच्यादृष्टिकोनातून बाहेर पडणे आणि अनुभवत असलेल्या अवघड परिस्थितीच्या मोठ्या संदर्भाचा विचार करणे. जेव्हा आपल्या लक्षात येते की, अशा अशांततेतून जात असलेल्या अनेक लोकांपैकी आपण एक आहोत, तेव्हा ती भावनिक धास्ती कमी वैयक्तिक वाटते. दुसरी रणनीती म्हणजे, आपल्या मुख्य मूल्यांशी आणि तत्वांशी जोडलेले राहणे आणि कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी त्यांचा वापर करणे.
बर्याच वेळा कामाच्या ठिकाणी ‘भावनिक थकवा’ जाणवतो, तेव्हा नवीन नोकरी शोधण्याची शक्यता व्यक्तीला जास्त वाटते. पण, ती शोधताना असुरक्षितसुद्धा वाटू शकते. त्या भीतीवर मात करण्यासाठी, आपण नेटवर्कमधील लोकांशी संपर्क साधत त्यांच्याशी संबंध पुन्हा निर्माण करत असतो. या संभाषणांमधून, आपल्या व्यावसायिक समुदायाशी संबंधित असल्याची भावना अधिक मजबूत होते. उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांबद्दल मौल्यवान माहिती गोळा करता येते आणि इतर व्यक्तीकडून आपण स्वतःला प्रमाणित करू शकतो असे वाटते. परिणामी, व्यक्तीला अधिक आशावादी वाटते. सध्या जरी तुम्ही दुसरी नोकरी सक्रियपणे शोधत नसला तरी, आपण जो निर्णय घेतला, त्याबद्दल अधिक चांगल्या आत्मविश्वास वाटत राहतो.
भावनिक ऊर्जा वाढवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे, व्यवसाय किंवा कामाशी संबंधित नसलेल्या कामांमध्ये सहभागी होणे-जसे की, फिरायला जाणे, मित्रांशी संपर्क साधणे किंवा स्वयंपाक किंवा बागकाम यांसारखे छंद जोपासणे. असे केल्याने मनाला आराम मिळतो. कामाच्या कटकटीपासून मानसिक अलिप्तता येते आणि भावनिक नियंत्रण आणि प्रभुत्वाची भावना निर्माण होते. भावनिक थकव्याचा एक कपटी परिणाम म्हणजे, जेव्हा तुम्हाला त्याचा त्रास होत असतो, तेव्हा तुम्हाला व्यायाम, सामाजिक संवाद किंवा छंदांसाठी आवश्यक असलेले प्रयत्न व्यवस्थापित करण्यासाठी खूप थकवा जाणवू शकतो. परंतु, तुम्ही ते मन सावरून करायला हवे.
नेहमीच शक्य नसले तरी, तणावावर उपचार करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तणाव दूर करणे. जर तुमचे कामाचे वातावरण तुमच्या भावनिक थकव्याचे कारण असेल, तर नोकरी किंवा कंपन्या बदलण्याचा विचार करा. तुमचा मॅनेजर किंवा बॉस तणावनिर्मितीसाठी कारणीभूत ठरत असल्यास, तुम्ही नवीन डिपार्टमेंटमध्ये बदली करण्याचा किंवा वेगळ्या मॅनेजरच्या हाताखाली काम करण्याचा विचार करू शकता.
अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुम्ही दबावाखाली असलेल्या मनासाठी करू शकता आणि भावनिक थकवा मन कमकुवत होण्याआधी दूर करू शकता. बरेच लोक स्वतःची काळजी किंवा आत्मजागरूकतेचा सराव करत नाहीत, ज्यामुळे भावनिक थकव्यासह विविध समस्या उद्भवू शकतात. भावनिक थकवा टाळण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी काही गोष्टी करणे सहज शक्य आहे.
तुमची उद्दिष्टे आणि स्वतःसाठी असलेल्या अपेक्षा पुन्हा आठवून पाहा. अवांछित गोष्टी कमी करण्यासाठी किंवा आयुष्यातून काढून टाकण्यासाठी ठराविक साप्ताहिक वेळापत्रकाचे मूल्यांकन करा.
स्वतःची काळजी आणि ‘माईंडफुलनेस’ तंत्रांचा सराव करा. उदाहरणार्थ, ध्यान, योग, व्यायाम आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम करून पाहा. हे तणाव कमी करू शकते. झोपेला मदत करू शकते.
स्वतःशी प्रामाणिक राहणे ही बरे होण्याची पहिली पायरी आहे. समस्या काय आहे हे ओळखणे, स्वीकारणे आणि त्यावर उपाय करणे, केव्हाही फायद्याचे ठरते.
तणाव व्यवस्थापनाचा अनुभव असलेले मानसिक आरोग्य व्यावसायिक शोधा.
कामाच्यादृष्टीने वास्तववादी मर्यादा निश्चित करून निरोगी कार्यजीवन संतुलन निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यावर लक्ष केंद्रित केल्याने हे ध्येय साध्य करण्यात मदत होऊ शकते.
कुटुंब आणि मित्रांसोबतचे महत्त्वाचे नातेसंबंध मजबूत करा, जे तुमच्या मनाचे प्रेमाने पालनपोषण करतात आणि चांगले श्रोते आहेत अशा लोकांसोबत वेळ घालवा.
तुमच्या जीवनातील सर्व पैलूंमध्ये तुमच्या प्राधान्यक्रमांचे पुनर्मूल्यांकन करा.
डॉ. शुंभांगी पारकर