अल्लू अर्जुनची चाहत्यांना कळकळीची विनंती; म्हणाला, "कोणत्याही प्रकारे.."

23 Dec 2024 13:14:30
 
allu arjun
 
 
मुंबई : अल्लू अर्जूनची प्रमुख भूमिका असणारा 'पुष्पा २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपाटांचे रेकॉर्ड मोडले. ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत भारतात १०६२ कोटींची कमाई केली आहे. दरम्यान, या चित्रपटाचा ४ डिसेंबर २०२४ रोजी हैदराबादमध्ये विशेष प्रिमियर आयोजित करण्यात आला होता ज्याच्यासाठी अल्लू अर्जूनसह रश्मिका मंदाना आणि इतर कलाकार उपस्थित होते. यावेळी चाहत्यांनी अल्लू अर्जूनला पाहण्यासाठी केलेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली होती आणि त्यात एका महिलेला जीव गमवावा लागला होता.
 
महिल्या मृत्यूमुळे अल्लू अर्जुनला काही दिवसांपूर्वी अटकही झाली होती. आता अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर सर्व चाहत्यांना कळकळीची विनंती करुन आवाहन केले आहे. त्याने लिहिले आहे की, "तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया जबाबदारीने मांडा अशी मी सर्व चाहत्यांना कळकळीची विनंती करतो. ऑनलाइन आणि ऑफलाइन कोणत्याही प्रकारची अपमानास्पद भाषा आणि वर्तवणूक करु नका. बनावट ID आणि प्रोफाइलद्वारे कोणी माझ्या चाहत्यांची दिशाभूल करत असेल, याशिवाय कोणी अपमानास्पद पोस्ट करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. अशा पोस्टमध्ये स्वतःला गुंतवू नका अशी मी चाहत्यांना विनंती करतो."
 

allu arjun  
 
 
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, पीडित कुटुंबाला अल्लू अर्जून आणि दिग्दर्शक सुकुमार यांनी रुग्णालयात जाऊन जखमी मुलाच्या तब्येतीची विचारपूस करत त्यांना ५ लाखांची मदत जाहिर केली होती.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0