पत्नीने केले ख्रिस्ती धर्मांतरण आता पतीवर धर्मांतरणासाठी टाकू लागली दबाव, अखेर पतीनेच गळफास लावून केली आत्महत्या

23 Dec 2024 13:29:57

conversion
 
रायपूर : छत्तीसगड येथे बालोदमध्ये एका तरुणाच्या पत्नीने ख्रिश्चन धर्मांतरण (conversion) केल्याच्या दबावाखाली आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. सूरज दिवांगन उर्फ गजेंद्र असे ३५ वर्षीय मृत पतीचे नाव असून त्याने एक सुसाईड नोटही लिहिली होती. गजेंद्रने आपल्या सुसाईड नोटमध्ये पत्नी राजेश्वरी आणि इतर सासरच्या मंडळींवर कारवाई करण्याचे नमूद केले होते. याप्रकरणी आता हिंदूंनी कठोर कारवाईची मागणी केली. मात्र आता पोलिसांनी धर्मांतरणाचे आरोप फेटाळून लावले आहेत. ही घटना शुक्रवारी २० डिसेंबर २०२४ रोजी घडली आहे.
 
प्रसारमाध्यमाच्या अहवालानुसार, ही घटना बालोद येथील जिल्ह्यातील अर्जुंदा पोलीस ठाणे हद्दीत घडली होती. शुक्रवारी याठिकाणी प्रभाग क्रमांक ११ मध्ये राहणाऱ्या सूरज दिवांगन नावाच्या तरूणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. मृत्यूआधी सुरजने घराच्या भिंतींवर सुसाईड नोट लिहून ठेवली होती. तेव्हा त्यांने त्यात लिहिले की, “माझी पत्नी राकेश्वरी दिवांगणा ही माझ्यासोबत वाद घालते. ती आपल्या मुलांना सोडून सतत तिच्या माहेरी जाते. यानंतर आता तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. तसेच तिने माझ्याकडून ५० हजार रूपये घेत पैसे परत केले नसल्याचेही नमूद केले आहे.
 
 
 
पत्नीसह सासरच्यांकडून वर्षानुवर्षे छळ होत असल्याचे संबंधित सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. या कारवाईत हलगर्जीपणा दाखवल्यास मोठे आंदोलन करण्यात येईल, असे विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी बलराम गुप्ता यांनी सांगितले की, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
 
याप्रकरणी आता पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी धर्मांतणाराचा दावा फेटाळला आहे. याप्रकरणी आता पोलिसांचे म्हणणे आहे की, याआधीही सूरजची पत्नी राजेश्वरीने पतीविरोधात मारहाणीचा दावा करण्यात आला असून तक्रार केली. दोन महिन्यांआधी सूरजने पोलिसांत तक्रार दाखल करून पत्नीवर मुलांना सोडून माहेरी जाणे, असे काही आरोप लावले होते. दरम्यान सुरजची पत्नी ही ख्रिश्चन धर्माचे पालन करते. यावरून आता दोघांमध्ये वारंवार वाद होत होते, असे पोलिसांनी याप्रकरणाची माहिती दिली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0