हृदयद्रावक! ट्रेनमध्ये महिलेला जिवंत जाळले, आठ तासानंतर आरोपीच्या आवळल्या मुसक्या

23 Dec 2024 17:59:43

Woman burned
 
न्यूयॉर्क : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील भुयारी मार्गात असणाऱ्या एका महिला प्रवाशाला जाळण्यात आल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना रविवारी घडली. न्यूयॉर्क पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास एक आरोपी सबवेमध्ये पीडित महिलेच्या अगदी जवळ आला होता. त्याचवेळी महिला स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर उतरण्याआधी सबवेला आग लागल्याचे वृत्त आहे.
 
न्यूयॉर्क पोलिस आयुक्त जेसिका टिळ यांनी सांगितले की, आरोपीने महिलेच्या अंगावर असलेल्या ब्लँकेटला लायटरचा वापर करत आग लावण्यात आली. या आगीमुळे ब्लँकेट काही सेकंदात जळून राख झाले. यानंतर आग महिलेच्या इतर कपड्यांमध्ये पसरली. पीडित महिलेची ओळख अद्यापही पटलेली नाही. महिलेच्या वस्त्राने पेट घेतल्यानंतर आरोपी स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर आला. त्यावेळी तो महिलेला पेटत असताना खुशाल पाहत होता. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
 
 
घटनास्थळी पोहोचलेल्या अपत्कालीन सेवेच्या कर्मचाऱ्यांनी तपासावेळी महिलेला मृत घोषित केले आहे. यावेळी पोलिसांनी प्राथमिक जबाबामध्ये सांगितले की, घटनेवेळी महिला झोपली होती. त्याठिकाणी आग लागण्यापूर्वी महिलेमध्ये आणि आरोपी यांच्यात कोणतेही संभाषण झाले नाही. यानंतर घटनास्थळी अधिकारी पोहोचले असून आग विजवण्याचा प्रयत्न केला.
 
यावेळी शाळकरी मुलांना आग लावणाऱ्या युवकाला पकडले. यादरम्यान आरोपीची व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. मात्र ओळख पटू शकली नाही असे सांगण्यात येत आहे. याप्रकरणाचे फुटेज सर्वत्र प्रसारित करण्यात आले होते. याप्रकरणात घटनेच्या अवघ्या ८ तासांनंतर पोलिसांनी त्याला दुसऱ्या मेट्रो रेल्वेमधून अटक करण्यात आली.
Powered By Sangraha 9.0