सर्वसामान्यांना दिलासा नाहीच! जीएसटी बैठकीत 'ती' मागणी फेटाळली

22 Dec 2024 15:50:38

gst 2
 
नवी दिल्ली (GST Council): जीएसटी परिषदेची बैठक शनिवार दिनांक २१ डिसेंबर रोजी राज्सथान येथे पार पडली. शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. परंतु दुसऱ्या बाजूला काही महिन्यांपूर्वी हेल्थ आणि लाइफ इन्शुरन्स प्रिमियमवरील जीएसटी हटवावी असा प्रस्ताव एका वरिष्ठ मंत्र्यांनी दिला होता. परंतु या प्रस्तावावर निर्णय घेणे जीएसटी परिषदेने टाळले आहे.
 
जीएसटी परिषदेतील सदस्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य आणि जीवन विम्यावरील प्रीमियमबाबतचा प्रस्ताव परिषदेसमोर ठेवण्यात आला. परंतु यावर अजून स्पष्टीकरणाची गरज असल्याचे मत परिषदेने व्यक्त केले. सध्या आरोग्य विमा, जीवन विमा, आणि यूनिट लिंक्ड इन्शुरन्सवर सध्या १८ टक्के जीएसटी आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार मंत्र्यांनी समूहाने कुटुंबातील सदस्यांना कव्हर करणाऱ्या जीवन विमा पॉलिसींसाठी जीएसटीमध्ये सूट प्रस्तावित केली होती. त्याच बरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विमा पॉलिसींवरील जीएसटी दर ५ टक्के कमी करण्याचाही प्रस्ताव मंत्री समूहाने ठेवला होता.

Powered By Sangraha 9.0