सोन्याचे भाव गगनाला भिडले! १० ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागणार तब्बल 'इतके' रूपये

22 Dec 2024 16:29:39
 
gold
 
मुंबई (Gold prices in India) : सोने खरेदी करणे म्हणजे गुंतवणुकदारांची पहिली पसंती राहिली आहे. परंतु सोने खरेदी करणे हे सर्वसामान्यांच्या आवाक्यात असेलच असे नाही. २०२४ या वर्षी सोने - चांदीने वाढीचा सर्वाधिक वाढीचा विक्रम केला आहे. सोन्याच्या दरात गेल्या वर्षभरात मोठी वाढा झाली आहे. जवळपास साधारण १७ ते १८ हजारांनी सोने महागले आहे.

भारतामध्ये आजच्या तारखेला २२ कॅरेट सोन्याची किंमत ७,१०० रूपये प्रति ग्रॅम असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,७४५ रूपये प्रति ग्रॅम आहे. दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. भारतात आज चांदीची किंमत ९१.५० रुपये प्रति ग्रॅम असून १ किलो चांदीची किंमत ९१,५०० आहे. सोन्या सोबतच चांदीच्या किंमतीत सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशांतर्गत सराफा बाजारातही आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भाव वाढलेले बघायला मिळाले. गेल्या सात दिवसांत २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत ६५० रुपयांनी वाढ झाली असून किंमत ही ७७,४५० रुपये आहे. येणाऱ्या वर्षात सुद्धा ग्राहकांना अशाच पद्धतीची भाववाढ अनुभवायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. 

Powered By Sangraha 9.0