परिक्षेला विलंब व्हावा म्हणून शाळेला थेट बॉम्बचीच धमकी

22 Dec 2024 15:16:52
Bomb Threat

नवी दिल्ली : दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी ( Bomb threat ) देण्यात आली होती. यात व्यंकटेश्वर ग्लोबल स्कूलचाही समावेश होता, पण व्यंकटेश्वर शाळेला मिळालेली धमकी ही दुसरी तिसरी कुणी नाही तर शाळेत शिकणाऱ्या भाऊ-बहिणीनेच दिली होती. परिक्षा पुढे ढकलण्यासाठी त्यांनी हा प्रताप केल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

सध्याच्या मुलांचा काही नेम नाही. दिल्लीतील रोहिणी येथे भर परिक्षेच्या काळात शाळेला बॉंम्बने उडवून देण्याची धमकी आली होती. या धमकीमागचा मुख्य सुत्रधार दुसरं तिसरं कोणी नसून याच शाळेतील दोन विद्यार्थी आहेत. परिक्षेचा अभ्यास न झाल्याने परिक्षेला विलंब करण्यासाठी या दोन भावंडांनी सरळ शाळेला बॉंम्बने उडवून देण्याची धमकी दिली. या धमकीनंतर सुरक्षिततेची दक्षता म्हणून त्वरित शाळा रिकामी करण्यात आली. पोलिस यंत्रणा, अग्निशमन दल, बॉंम्बशोधक पथके तैनात करण्यात आली. सगळीकडे तपास करण्यात आला. तपासादरम्यान काहीच संशयास्पद सापडले नाही.

संपुर्ण चौकशी व शोधमोहिमेअंती शाळेतील विद्यार्थ्यांनीच ही धमकी दिल्याचे समोर आले. अशाप्रकारे पश्चिम विहार व आणखी दोन शाळेतही विद्यार्थ्यांनीच बॉम्बची धमकी दिली होती.

Powered By Sangraha 9.0