कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूर येथील एका घटस्फोटित हिंदू महिलेने नौबस्ता पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. ज्यात अकील नावाच्या एका कट्टरपंथीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आणि इस्लाम धर्म स्वीकारण्यास तिच्यावलर दबाव आणण्यात आणल्याचा आरोप केला आहे. अश्लील व्हिडिओ वापरून तिच्याकडून ५ लाख रूपये उकळण्याचा धक्कादायक प्रकार घडला असल्याचे वृत्त आहे.
याप्रकरणात सुरूवातीला पोलिसांनी पीडित आणि अकील यांच्यात तडजोड घडवून आणली गेली, मात्र संबंधित पीडितीवरील छळ थांबेना. त्यावेळी पीडितेने पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस उपायुक्तांशी संपर्क साधून याप्रकऱणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
याचप्रकरणात प्रसारमाध्यमाच्या रिपोर्टनुसार. ही घटना कानपूर येथील दादा नगर भागात घडली. याप्रकरणातील पीडित महिला ही बारा येथील घटस्फोटित हिंदू महिला असून ती एका कारखान्यात काम करत होती तिथेच आरोपी अकील हा कंत्राटदार होता. यावेळी दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर दोघांचा एकमेकांसोबतचा संपर्क वाढत गेला. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री वाढत गेली आणि त्यानंतर अकीलने आपण अविवाहीत असल्याचे सांगितले. त्याने तिला विवाह करण्याचे आश्वासन दिले होते. याचकारणाने अनेकदा तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी अनेकदा पीडितेने शारिरीक संबंध ठेवण्यास विरोध दर्शवला होता मात्र अकील ऐकायला तयार झाला नाही.
याप्रकरणी आता पीडितेने पोलिसांना सांगितले की, अकील पीडितेला अनेकदा हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि तिचे अश्लील व्हिडिओ फोटो रेकॉर्ड केले. दरम्यान पीडित मुलगी गरोदर राहिली त्यावेळी अकीलला याप्रकरणाची माहिती मिळताच पीडितेला गर्भपात करण्यात अनेकदा भाग पाडले गेले. त्यावेळी पीडितेला अकीलबाबत खरी माहिती समोर येताच तिचे पितळ उघडे पडले गेले. अकील मुस्लिम असल्याचा मोठा गौप्यस्फोट समोर आला.
जेव्हा पीडितेने त्याचा सामना केला तेव्हा अकीलने तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणण्यास सुरूवात केली. पीडितेने धर्मांतरण करण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर अकीलकडे पीडितेचे अश्लील व्हिडिओ आणि फोटोचा वापर करत तिला अनेकदा ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिच्याकडून ५ लाख रूपये उकळले.
तिच्याकडे कोणताही पर्याय नसताना पीडितेने अकीलच्या पत्नीशी संपर्क साधला. जेव्हा तिथे आपल्या पत्नीला तिच्या त्रासाबद्दल सांगितले तेव्हा तिला मदत करण्याऐवजी अकीलची पत्नी आणि त्याच्या तीन मेहुण्यांनी पीडितेवर अमानुषपणे मारहाण करत अत्याचार केला. याप्रकरणी आता अकीलने पीडितेवर ५ लाख रूपये देण्यासाठी आणि इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकणे थांबवले नाही. २० डिसेंबर रोजी, पडितेने एडीसीपीकडे जाऊन तपास करण्याचा निर्देश दिले आहेत. याप्रकरणी आता एडीसीपींनी दखल घेत नौबस्ता पोलीस ठाण्याला या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. अशातच आता त्यांनी कानपूरमध्ये लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि अकीलवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.