मुंबईत हिट अॅन्ड रन, ४ वर्षांच्या मुलाला भरधाव वेगाने धडक देत संपवले

22 Dec 2024 18:19:12

Hit and run
 
मुंबई : एका वाहन चालकाने ४ वर्षाच्या निष्पाप मुलाला भरधाव वेगाने धडक देत अपघात करण्यात आल्याची धक्कादायक घटना मुंबईतील वडाळा येथे घडली आहे. हे प्रकरण वडाळा येथील आंबेडकर महाविद्यालयाजवळील आहे. शनिवारी २१ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
 
मृत लहान मुलाचे नाव आयुष लक्ष्मण किनवडे असे आहे. तो एका गरीब कुटुंबात राहत होता. त्याचे वडील हे मजुरीचे काम करत घरातील उदरनिर्वाह करत होते. आयुषचे कुटुंब फूटपाथवर राहत होते. लहान मुलाला धडक देणाऱ्या वाहन चालकाचे नाव समोर आले आहे. भूषण गोळे असे वाहन चालकाचे नाव असून त्याचे वय वर्षे हे १९ आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान कारचालक हा घटनास्थळी मद्यधुंद होता का? असा अनेकांना सवाल उपस्थित झाला आहे. मात्र याबाबतची माहिती अद्यापही समोर आली नाही. याप्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0