गुगलमध्ये १० % रोजगार कपात! १२ हजार कर्मचारी निष्काषीत

21 Dec 2024 18:49:01

google
 
वॉशिंग्टन डीसी (Google Layoffs) : आंतरराष्ट्रीय टेक कंपनी असलेल्या गुगलने १० % कामगार कपातीचा निर्णय घेतला आहे. कंपनीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी दिली आहे. गेली अनेक वर्ष गुगल आपल्या कामाची परिणामकारकता वाढवण्यासाठी व्यावसायिक धोरण म्हणून ही कपात करत असल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे. कंपनीची कार्यशैली सुकर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे.

सप्टेंबर २०२२ रोजी सुंदर पिचाई यांनी गुगलला २० % कार्यक्षम बनवण्याचे धोरण अंगीकारले. यामध्ये विविध स्तरांवरील व्यवस्थापक, संचालक आणि उपाध्यक्षांना कामावरून कमी करण्यात येत आहे. या वर्षी तब्बल ४ वेळा हा रोजगार कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. या वर्षी जानेवारीमध्ये जाहीरात विभागातून जवळपास १०० जणांना कामावरून कमी करण्यात आले. यानंतर गुगलने आपल्या क्लाउड युनिट मधून १०० जणांना कमी केले. गेल्या वर्षी देखील गुगलने १२००० कर्मचाऱ्यांची कपात केली होती.
 
 
Powered By Sangraha 9.0