जगदीप धनखड यांच्यावरील अविश्वासाचा प्रस्ताव फेटाळला!
20 Dec 2024 13:15:03
नवी दिल्ली : राज्यसभेचे उपसभापती हरीवंश यांनी गुरूवारी, राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्यावरील अविश्वसाचा प्रस्ताव फेटाळला. या बद्दलचे स्पष्टीकरण देताना उपसभापती म्हणाले की विरोधीपक्षाने जाणीवपूर्वक उपराष्ट्रपतींची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकांना प्रसिद्धी मिळावी या हेतुने हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याच बरोबर या प्रस्तावामध्ये अनेक तांत्रिक चुका होत्या असे सुद्धा हरीवंश यांनी नमूद केले. स्वतंत्र भारातातील ही पहिलीच घटना आहे जिथे राज्यसभेच्या अध्यक्षांना पदच्युत्त करण्याचा प्रयत्न केला गेला.
विरोधी पक्षातील नेत्यांनी सादर केलेला प्रस्ताव हा मीडीया रिपोर्टस्वर आधारीत होता. असे मत उपसभापतींनी व्यक्त केली त्याच बरोबर उपसभापती म्हणाले की घटनेच्या कलम ९० (सी)नुसार प्रस्ताव आणण्यासाठी १४ दिवस आधी नोटीस देणे आवश्यक आहे. परंतु संसदेचे हिवाळी अधिवेशन २० डिसेंबर रोजी संपणार असल्यामुळे सदर प्रस्तव वैध धरला जाणार नाही. विरोधीपक्षातील नेत्यांनी धनखड यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी ६० खासदारांचे हस्ताक्षर घेत अविश्वासाचा ठराव समोर ठेवला. परंतु हा प्रस्ताव पूर्णुपणे संविधान विरोधी असल्यामुळे उपसभापतींकडून फेटाळला गेला आहे.