मुंबई : विक्रांत मेस्सी याची प्रमुख भूमिका असणारा 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट आज दिनांक २ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळीसंसद भवनाच्या बालयोगी सभागृहात पाहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि अनेक कॅबिनेट मंत्रीही उपस्थित राहणार आहेत.
गोध्रा आगीच्या सत्य घटनेवर आधारित एकता कपूर आणि विक्रांतचा हा चित्रपट यूपी, उत्तराखंडसह राज्यांनी करमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ वाजता नवी दिल्लीतील बालयोगी ऑडिटोरियम इथे पाहणार असून मोदी यांनी यापूर्वी देखील चित्रपटाचं कौतूक केलं आहे. या चित्रपटात विक्रांत मेस्सीची प्रमुख भूमिका असून राशी खन्ना, रिद्धी डोगरा, बरखा सिंग यांनीही महत्वपुर्ण भूमिका साकारल्या आहेत.
'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरुन कौतुक करत लिहिलं होतं की, “एकदम योग्य, ही चांगली बाब आहे की, आता सत्य समोर येतय. सर्वसामान्य लोकं ते पाहू शकतात. एक फेर नरेटिव काही काळासाठी असतं. शेवटी फॅक्टस समोर येतात”.