मुंबई : महाराष्ट्रातील अत्यंत नामवंत आणि प्रख्यात संस्था ‘आयडियल पुस्तक त्रिवेणी, दादर’ आणि महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा म्हणजेच श्री. पु. भागवत पुरस्कार प्राप्त संस्था ‘नवचैतन्य प्रकाशन, बोरिवली वेस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने नामवंत साहित्यिकांच्या ग्रंथसंपदेवर २५% सवलत देण्यात येणार आहे. १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीतच या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. या संधीचा सर्व वाचकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नवचैतन्य प्रकाशनतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी शरद मराठे (९८६९०२७३९, ७७३८०७२३६१) यांच्याशी संपार्क साधावा.