'एक देश, एक निवडणूक’ जेपीसीचा अहवाल अर्थसंकल्पीय अधिवेशनात, लोकसभेतील २१ तर राज्यसभेतील १० खासदारांचा समावेश

19 Dec 2024 13:57:38
 
jpc
 
नवी दिल्ली : (JPC) ‘एक देश, एक निवडणूक’ यासाठी स्थापन होणाऱ्या संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) लोकसभेतील सदस्यांची नावे जाहिर करण्यात आली आहेत. पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवसापर्यंत समिती या सभागृहाला अहवाल देईल.
 
संसदेत सादर करण्यात आलेल्या १२९व्या घटना (दुरुस्ती) विधेयकाचे पुनरावलोकन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जेपीसीमध्ये समाविष्ट असलेल्या लोकसभेतील खासदारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. जेपीसीमध्ये लोकसभेतील २१ आणि राज्यसभेतील १० खासदारांची निवड करण्यात आली आहे. राज्यसभेच्या १० सदस्यांची नावेही लवकरच जाहिर होणार आहेत.
 
जेपीसीमध्ये लोकसभेचे २१ सदस्य आहेत. यामध्ये पी.पी. चौधरी, सी.एम. रमेश, बन्सुरी स्वराज, पुरुषोत्तमभाई रुपाला, अनुराग ठाकूर, विष्णू दयाल राम, भत्रीहरी महताब, संबित पात्रा, अनिल बलुनी, विष्णू दत्त शर्मा, प्रियांका गांधी वाड्रा, मनीष तिवारी, सुखदेव भगत, धर्मेंद्र यादव, कल्याण बॅनर्जी, टी.एम. सेल्वगणपती, जी.एम. हरीश बालयोगी, सुप्रिया सुळे, श्रीकांत एकनाथ शिंदे, चंदन चौहान आणि बालशौरी वल्लभनेनी यांच्या नावांचा समावेश आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0