नवी दिल्ली : भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारंवार द्वेष करणाऱ्या काँग्रेसने, त्यांच्याच नावाचा वापर करत आता संसदेत गदारोळ माजवण्याचा चंग बांधला आहे. अशातच आता बाबासाहेबांबद्दल असलेला काँग्रेसचा आकास चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसची सत्ता असताना NCERTच्या पुस्तकात रेखटलेले बाबासाहेबांचे व्यंगचित्र आता व्हायरल होत आहे. तत्तकालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने त्यावेळी आक्षेप घेऊन व्यंगचित्र मागे घ्यायला लावले होते. यावरूनच आता भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काँग्रेसला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. जवाहरलाल नेहरु यांनी कायमच आंबेडकरांचा द्वेष केला होता. त्यामुळे काँग्रेसने आता उगीच मगरीचे अश्रू ढाळू नयेत असे वक्तव्यं प्रधान यांनी केले आहे.
आपल्या वक्तव्याची पुष्टी करतना केंद्रीय मंत्र्यांनी २०१२ साली प्रकाशित झालेल्या एनसीआरटी पुस्तकाचा हवाला दिला. यामध्ये एका व्यंगचित्राद्वारे बाबासाहेबांच्या कार्याचा अपमान केला असल्याचे प्रधान यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या बोलण्यात आणि वागण्यात अंतर आहे, त्यामुळे त्यांनी असे मगरीचे अश्रू ढाळू नये असे आवाहन प्रधान यांनी केले आहे. व्यंगचित्राबद्दल बोलताना प्रधान म्हणतात की या व्यंगचित्राला नक्कीच गांधी कुटुंबीयांनी हिरवा कंदील दाखवला असणार. स्वत:च्याच घरातील लोकांना भारतरत्न देणाऱ्या गांधी कुटुंबाने कधीही आंबेडकरांचा योग्य तो सन्मान केला नाही. आणि आता जेव्हा मोदी सरकार बाबासाहेबांचा, त्यांच्या संविधानाचा योग्य तो सन्मान करत असताना, काँग्रेसला हीच गोष्ट खुपत आहे. आंबेडकरांचे नाव फक्त राजकारणापुरतं वापरण्यात काँग्रेस धन्यता मानते, परंतु वास्तव तर हे आहे की जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते राहुल गांधी यांच्या पर्यंत सगळ्यांनी बाबासाहेबांचा निव्वळ द्वेष केला आहे.