महाराष्ट्रात व्होट जिहादसाठी दुबईतून ६०० कोटी रुपयांचे फंडींग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट!

19 Dec 2024 19:09:01

cm devendra fadnavis
 
नागपूर : (CM Devendra Fadnavis) विधानसभा जिंकण्यासाठी विरोधकांनी ‘व्होट जिहाद’चा नारा दिला. मालेगाव येथील काही जणांच्या खात्यात ११४ कोटी रुपये जमा झाले. सीराज महंमद याने हे पैसे १४ खात्यांमध्ये वर्ग केले. विधानसभा निवडणुकीसाठी २१ राज्यातूंन २०१ खात्यांमध्ये पैसे आले. हे पैसे १ हजार खात्यांमध्ये वर्ग करण्यात आले. यांतील ६०० कोटी रुपये दुबईतून आले होते. त्यांमधील १०० कोटी रुपये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी वापरले गेले, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला.
 
गुरुवार, दि. १९ डिसेंबर रोजी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देतांना फडणवीस यांनी महाविकास आघाडीचा भांडाफोड केला. फडणवीस म्हणाले, देशाच्या निवडणुकीत परकीय शक्तींचा हस्तक्षेप झाल्याचे पुरावे संसदेत सादर झाले आहेत. दहशतवाद विरोधी पथकाकडून याचे अन्वेषण चालू आहे. देशविरोधी शक्तींना बंदूक ठेवण्यासाठी विरोधकांनी स्वत:चा खांदा वापरायला देऊ नये, असे आवाहन या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
 
शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनाही मुख्यमंत्र्यांनी खडेबोल सुनावले. फडणवीस म्हणाले, आव्हाडांनी काढलेल्या 'ईव्हीएम'विरोधी यात्रेत मार्गदर्शक कोण? अॅड. मेहमूब प्राचा. ज्याने जर्मन बेकरी, बेस्ट, दिल्ली बॉम्ब स्फोटातील आरोपींचे वकीलपत्र घेतले होते. त्यामुळे आव्हाडांनी अशा आचा, प्राचांपासून दूर रहावे, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0