"महाराष्ट्रापेक्षा गुजरातचं कौतुक हेच लोक करतात!"; देवेंद्र फडणवीसांनी मविआला झापलं

19 Dec 2024 17:56:08

cm devendra fadnavis
 
नागपूर : (CM Devendra Fadnavis) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना विरोधकांना थेट भाषणातून टोला लगावला आहे. त्यांनी महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला वळवले गेले या विरोधकांच्या सततच्या रडगाण्यावर उपहासात्मक टिका केली आहे.
 
"विरोधक सांगतायत गुजरात चांगलं आहे"
 
"गुजरात राज्य पेपरमध्ये जाहिरात का देतं की आमचं राज्य चांगलं आहे. त्याची काही गरजच नाहीये, आपले विरोधकच सांगतायत गुजरात चांगलं आहे, गुजरात चांगलं आहे. हेच रोज प्रचार प्रसार करतायत की तिकडेच चाललंय, तिकडेच चाललंय, महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला चालले, पण तुम्ही काही काळजी करु नका, महाराष्ट्र कालही नंबर वन होता आजही नंबर वन आहे आणि उद्याही नंबर वनच राहील. महाराष्ट्राशी कोणीही स्पर्धा करु शकत नाही, महाराष्ट्राची आपली एक ताकद आहे." असे मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.
 
 
Powered By Sangraha 9.0