संभल : उत्तर प्रदेशातील संभल येथील समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) खासदार झियाउर रहमान बुर्के यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली होती. त्यावेळी बुर्के यांच्या कुटुंबीयांनी संबंधित पथकाला वीज मीटर तपासणीपासून विरोध केला. याप्रकरणी कनिष्ठ अभियंत्याला धमकी दिल्याप्रकरणी समाजवादी पक्षाच्या नेत्यावर एफआरआय लागू करण्यात आल्याचे वृत्त आहे. मोठ्या संख्येने पोलीस रॅपिड अॅक्शन फोर्स आणि पीएसी कर्मचारीही या पथकासोबत उपस्थित होती असे वृत्त आहे. ही घटना १९ डिसेंबर २०२४ रोजी घडली होती.
उत्तर प्रदेश वीज अभियंता डीके गुप्ता म्हणाले की, दोन जेई आणि दोन एसडीओसह पाच जणांचे पथक सकाळी झियाउर रहमान बुर्के यांच्या घरी गेले होते. नेत्याचे कुटुंबीय अधिकाऱ्याला वीज तपासून देत नव्हते. मात्र नंतर कनिष्ठ अभियंता यांनी कुलूप उघडले असता त्याला धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी आता एफआरआय दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.
याप्रकरणावर आता वरिष्ठ अभियंता डीके गुप्ता म्हणाले की, "एकूण १६. ५ किलोवॅटचा भर एकूण थकबाजी नोंदवण्यात आली होती. प्रत्येकी २ किलोवॅटचे दोन कनेक्शन होते. यातील एक झियाउर रहमान बुर्के यांच्या नावावर आहे. तर दुसरे त्यांच्या आजोबांच्या म्हणजे शफीकुर रहमान बुर्के यांच्या नावावर असणे गरजेचे आहे. झियाउर रहमान बुर्के यांच्याविरोधात वीजेची चोरी केल्याप्रकरणी एफआरआय दाखल करण्यात आली आहे", यावेळी वीजेच्या मीटरचा एकूण एमआरआयही काढण्याच आल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
खासदार झियाउर रहमान यांची धमकी
खासदार झियाउर रहमानने धमकी देत म्हणाला की, बुर्के यांनी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना धमकावले असून आमचे सरकार आल्यास आम्ही हे प्रकरण सांभाळून घेऊ, असे उलट उत्तर दिले. यानंतर वीज विभागाने झियाउर रहमान बुर्केविरोधात धमकी दिल्याप्रकरणी आणि वीज चोरीप्रकरणात कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दिली.