महादेवाच्या मंदिरात नतमस्तक होणाऱ्या भाजप नेत्याला पाहून पत्रकाराला पोटशूळ

19 Dec 2024 15:17:22

Tajinder Singh
उज्जैन : भाजप नेते तजिंसदर बग्गा (Tajinder Singh) यांनी एका उज्जैन येथील हिंदू मंदिराला भेट दिल्याने त्यांची खिल्ली उडवल्याचा प्रकार घडला आहे. तुम्ही केवळ सनातन धर्माचे पालन करत आहात, सुवर्ण मंदिरातही डोके टेकवा. अशा डाव्या विचारधारेच्या पत्रकार मृणाल पांडे यांनी गरळ ओकली आहे.
पत्रकार मृणाल पांडे यांनी बिग बॉस फेम आणि भाजप नेता तजिंदर बग्गा हे हिंदू धर्मातील देवांचे देव महादेवाच्या मंदिरात गेल्याने त्यांची खिल्ली उडवली आहे. आपण कधी तरी सुवर्ण मंदिरातही आपले डोके टेकवा, असे प्रतिपादन केले. या वक्तव्यामुळे हिंदू धर्म आणि शीख धर्मात दरी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, हाच प्रयत्न संबंधित पत्रकाराचा असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संबंधित माहिती शेअर केली आहे.
 
 
दरम्यान, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अशी की, खलिस्तानी आपल्या वर्चस्वाला बलस्थान देत आहेत. हिंदू देवातांप्रती श्रद्धा दर्शवणाऱ्या एका शीख धर्मीय असणाऱ्या नेत्याची विनाकारण खिल्ली उडवली जात असल्याचे बोलले जात आहे. अशातच हिंदू देवता आणि हिंदू धर्मशास्त्रात शिख धर्मासह इतर छंदासही अनन्यसाधारण महत्त्व आहे. बग्गा हे महादेवाच्या चरणी लीन होण्यासाठी गेले होते. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावरूनच आता त्यांना कोणतेही एक कारण नसताना बग्गा यांना घेरले आहे. त्यामध्ये कोणतेही एक तथ्य नसल्याचे बोलले जात आहे. 
 
Powered By Sangraha 9.0