भारतात स्टारलिंकचे सॅटेलाईट बंद, मस्कने बेकायदेशीर उपकरणांचा दावा नाकारला

18 Dec 2024 19:17:36
 

Untitled 
 
नवी दिल्ली : स्पेसएक्स चे संस्थापक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी भारतात सॅटेलाइट बंद करण्यात आले असल्याचे सांगितले आहे. भारताच्या हिंसाचारग्रस्त मणिपूर भागात त्यांच्या कंपनीचे उपकरणे वापरली जात असल्याचा दावा केला होता. मात्र आता त्याला प्रत्युत्तर म्हणून विधान करण्यात आले आहे. सुरक्षा दलांनी अलीकडेच इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील मासेमारी करत असताना इंटरनेट उपकरणे आणि शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली होती अशी माहिती सांगण्यात आली आहे.
 
भारतीय लष्कराच्या स्पीयर कॉर्प्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'X' वर जप्त केलेल्या वस्तूंची छायाचित्रे शेअर करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. ज्यात एका वापरकर्त्यांच्या लक्षात आले की एका डिव्हाइसवर स्टारलिंक लोगो आहे. यावर लक्ष वेधत एका सोशल मीडिया युजरने 'X' वर पोस्ट शेअर करत सांगितले की, स्टारलिंकचे बरेचसे वापरकर्ते हे दहशतवादी आहेत. आशा आहे की, एलॉन मस्क याकडे लक्ष देतील आणि या तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्यास मदत केली जाईल, असे उत्तर दिले आहे.
 
 
 
पोलिसांनी दिलेल्यानुसार माहितीनुसार, केराव खुनौ येथून जप्त केलेल्या एकूण साहित्यात इंटरनेट सॅटेलाइट अँटेना, इंटरनेट सॅटेलाइट राउटर आणि २ मीटर एफटीपी वायर यांचा यामध्ये समावेश आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की. स्टारलिंकसारखी उपरकरणे जप्त झाल्यानंतर एजन्सींनी हे उपकरण हिंसाचारग्रस्त मणिपूर येथील राज्यात कसे पोहोचले याचा तपास सुरू केला. 
 
सॅटेलाइट इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या मस्कच्या स्टारलिंक कंपनीकडे भारतात काम करण्यासाठी कोणताही एक परवाना नाही. गतवर्षी मे महिन्यापासून मणिपूर येथील मेईतई आणि कुकी-जो गटांमध्ये झालेल्या जातीय हिंसाचारात २५० हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले असून इतर काही लोक हे बेघर झाल्याची माहिती समोर आली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0