नवी दिल्ली : टीम इंडियाचा ऑल राऊंडर खेळाडू आणि आपल्या फिरकीच्या जादूने नावारूपाला आलेला गोलंदाज आर. अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या ऑस्ट्रेलियातील गाबा येथे खेळवण्यात आलेल्या कसोटी मालिकेदरम्यान दि: १८ डिसेंबर २०२४ रोजी त्याने निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे. पत्रकार परिषद घेत त्याने आंतरराष्ट्रीय खेळातून बाहेर पडत असल्याची माहिती अधिकृतरित्या सांगितली.
निवृत्तीची घोषणा करण्याआधी टीम इंडियाचा फलंदाज विराट कोहलीच्या गळ्यात गळे घालून त्याला अश्रू अनावर झाले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पत्रकार परिषदेआधी अश्विनने आपले प्रशिक्षक गौतम गंभीरची भेट घेतली. त्यानंतर त्याने टीम इंडियाचा फलंदाज रोहित शर्मासोबत पत्रकार परिषद घेत आपल्या निवृत्तीबाबत दुजोरा दिला.
आर. अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी निवृत्ती घेतली असली तरीही तो टी २० आणि आयपीएल मध्ये चेन्नई सुपरकिंग्ज या संघासोबत खेळताना दिसणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेदरम्यान ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत अश्विनला संधी मिळाली. या कसोटीत त्याला एकच विकेट मिळाली.
ब्रिस्बेन येथील तिसरी कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर कर्णधार रोहित शर्मासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत अश्विन म्हणाला की, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. भारतीय क्रिकेटपटू म्हणून हा माझा शेवटचा दिवस आहे. त्याच्या या निर्णयाने विराटसह रोहितही भावूक झाला होता. यासोबत त्याच्या निवृत्तीने बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आर. अश्विनच्या कामगिरीवर कौतुकाची दाद दिली आहे. ' कौशल्य, प्रतिभा आणि नाविन्य यांचा समानार्थी शब्द अश्विन असा आहे, असे ट्विट केले.
विराट कोहली भावूक
यावेळी विराट कोहलीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अश्विनप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तो म्हणाला की. आज तुझ्यासोबत गेली १४ वर्षे क्रिकेट खेळत आहे. तू आज निवृत्त होत आहेस असे तु मला सांगितले तेव्हा मी भावूक झालो. आतापर्यंत एकत्रपणे खेळत असलेल्या सर्व आठवणी नव्याने ताज्या झाल्या आहेत. सामने जिंकण्याचे कौशल्य तुझ्याकडे होते. त्यात तू कधीही मागे राहिला नाहीस. तुझ्या प्रत्येक गोष्टींसाठी तुझे आभारी असेल मित्रा धन्यवाद! विराट कोहलीने पोस्ट करत ट्विट केले.
३८ वर्षीय अश्विन भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज आहे. त्याच्या नावावर एकूण ५३७ कसोटी विकेट्स आहेत. तो फक्त अनिल कुंबळेंच्या ६१९ विकेट मागे आहे. अश्विनने २०११ मध्ये कसोटी मालिका खेळण्यास सुरूवात केली होती. त्याच्या १०६ कसोटी सामन्यात एकूण ५३७ विकेट घेतली होती. त्याने अनेकदा आठ वेळा दहा विकेट घेण्याचा विक्रम केला होता.
अश्विनच्या क्रिकेट कारकिर्दितील थोडक्यात आढावा
तसेच ११६ एकदिवसीय सामन्यात आऱ. अश्विनने एकूण १५६ विकेट मिळवल्या होत्या. तसेच अश्विन हा ऑल राऊंडर खेळाडू असल्या कराणाने त्य़ाने १५१ कसोटी सामन्यांमध्ये एकूण ३५०३ धावा केल्या होत्या. या काळात त्याने ६ शतके आणि १४ अर्धशतके झळकावली. एकदिवसीय सामन्यात त्याने ६३ डावात ७०७ धावा केल्या आहेत. त्याचवेळी, टी-20 इंटरनॅशनलमध्ये अश्विनला १९ डावात केवळ १८४ धावा करता आल्या.