नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे नेते धर्मेंद्र यादव यांनी एक देश एक निवडणूक या विधेयकाला विरोध दर्शवत, सदर विधेयकाचा निषेध केला आहे. त्याच बरोबर काँग्रेस, त्रुणामूल काँग्रेस, समाजवादी पक्षातील नेत्यांनी सुद्धा या विधेयकाला विरोध दर्शवला आहे. कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मंगळवार दिनांक १७ डिसेंबर रोजी एक देश एक विधेयक लोकसभेत सादर केले. सदर विधेयक संसदेसमोर आणल्या नंतर त्यावरील घटनात्मक बाबींवर चर्चा होणार आहे.
समाजवादी पक्षाचे नेते धर्मेंद्र यादव यांनी प्रश्न विचारला की हे विधायक आणायाची गरज काय तसेच, या विधेयकमुळे एका प्रकारे हुकुमशाही या देशात लागू केली जाईल. हे विधायक संविधान विरोधी, मुस्लीम विरोधी असल्याचा अजब दावा यादव यांनी केला आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते कल्याण बॅनर्जी यांनी सुद्धा एक देश एक निवडणूक या विधेयकाला घटना विरोधी ठरवत, हे विधायक केवळ एका माणसाच्या इच्छेच्या पूर्ततेसाठी सादर करण्यात आल्याचा दावा केला गेला आहे. माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार उबाठा गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सुद्धा या विधेयकाला विरोध दर्शवला आहे. सत्तेचे केंद्रीकरण करण्याचा डाव सत्ताधारी आखत असून यामुळे संविधानावर हल्ला केला जातो आहे असे मत प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केले आहे.