'एक देश, एक निवडणूक' विधेयक 'जेपीसी'कडे पाठवणार

17 Dec 2024 16:14:49

loksabha
 
नवी दिल्ली : (One Nation One Election Bill) केंद्रातील मोदी सरकारने 'एक देश, एक निवडणूक' या विधेयकाला गुरुवार, दि. १२ डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. त्यानंतर मंगळवार, दि. १७ डिसेंबर रोजी केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी 'एक देश एक निवडणूक' विधेयक लोकसभेत सादर केले आहे. या विधेयकाला लोकसभेत काँग्रेस सहीत इंडी आघाडीनेही विरोध दर्शवल्याचे समोर आले आहे. अशातच एक देश, एक निवडणूक विधेयकाला अखेर संसदेच्या संयुक्त समितीकडे (Joint Parliamentary Committee) पाठवले जाणार आहे.
 
एक देश, एक निवडणूक विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मांडला आहे. सरकारने आज हे विधेयक लोकसभेत सादर केले. मात्र हे विधेयक संविधानविरोधी असल्याचा ठपका ठेवत विरोधी पक्षांनी याला विरोध केला. संसदेच्या संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्यापूर्वी त्यावर लोकसभेत मतदान घेण्यात आले. यावेळी विधेयकाच्या बाजूने २६९ तर विरोधात १९८ सदस्यांनी मतदान केले.
 
 
Powered By Sangraha 9.0