वाराणसीतील मुस्लिम बहुल भागात सापडले २०० वर्ष जुने बंद मंदिर

17 Dec 2024 15:15:10
Varanasi

लखनऊ : उत्तर प्रदेशातील संभल प्रकरणानंतर आता वाराणसीतील ( Varanasi ) मदनपुरा भागात ४० वर्षे जुने मंदिर सापडले आहे. यासंदर्भात सीएम योगींना पत्र लिहून सनातन रक्षक दलाकडून हे मंदिर उघडण्याची मागणी करण्यात आली आहे. हे मंदिर १५० ते २५० वर्षे जुने असल्याचा दावा केला जात आहे. स्कंद पुराणातील काशीखंडात या मंदिराचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे. या मंदिराजवळच्या सिध्दतीर्थ विहीरीचाही उल्लेख यात दिसून येतो.

वाराणसीमधील मदनपुरा येथील मुस्लिम बहुल भागात एक बंद मंदिर असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले. या बंद मंदिराला विजेच्या तारांचा विळखा आहे. मंदिराच्या आत भंगार, माती भरलेली आहे. आजूबाजूच्या घरांची छते मंदिराला लागून आहेत. मंदिराच्या बाजूच्या गेटला जमाल सन्स असा बोर्ड लावलेला आहे. ४० फूट ऊंचीचे मंदिर ४० वर्षे बंद असल्याचा दावा सनातन रक्षक दलाकडून करण्यात आला आहे. हे मंदिर उघडण्याच्या मागणीचे पत्र सीएम योगी यांना लिहिले आहे.

सनातन रक्षक दलाचे प्रदेशाध्यक्ष अजय शर्मा यांनी सांगितले आहे की, "हे मंदिर सनातन संस्कृतीचे प्रतिक आहे. मंदिराला उघडण्यासंबंधी प्रशासनाशी बोलणे झाले आहे. शांतीपूर्वक पध्दतीने या मंदिराविषयीचे निर्णय घेण्यात येतील. लवकरच या मंदिरात पारंपरिक पूजा-अर्चना सुरु करण्यात येईल." यासंबंधी सीएम योगी आदित्यनाथ यांना पत्रदेखील लिहिले असल्याची माहिती त्यांनी दिली.

Powered By Sangraha 9.0