काँग्रेसने स्वार्थासाठी केली घटनादुरूस्ती; निर्मला सीतारामन यांची संसदेत टिका

16 Dec 2024 13:44:32

fm 1

नवी दिल्ली : " या देशात झालेली पहिली घटनादुरूस्ती ही समाजमाध्यमांसाठी हानीकारक होती. आज देखील या घटनादुरूसतीचा समाजमाध्यमांना फटका बसतो. अनेक खासदार या घटनादुरूस्तीच्या विरोधात असून सुद्धा पंतप्रधान नेहरू यांनी ही घटना दुरूस्ती केली होती." असे मत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले. सोमवारी राज्यसभेत बोलताना त्यांनी काँग्रेसचे अनेक घटनाविरोधी निर्णय सप्रमाण समोर आणले. त्याच सोबत काँग्रेसने अनेक घटनादुरूस्त्या गांधी कुटुंबाच्या हितासाठी केल्या असे मत व्यक्त केले.

संविधानाच्या पहिल्या घटनादुरूस्तीवर भाष्य करताना निर्मला सीतारमन म्हणाल्या की "सर्वोच्च न्यायालय १९५० साली एका खटल्यामध्ये कम्युनिस्टांच्या क्रॉसरोड्स आणि रास्वसंघाच्या ऑर्गनायझर या मुखपत्राच्या बाजूने निकाल दिला होता. परंतु यालाच प्रतिवाद म्हणून तत्तकालीन अंतरीम सरकारने पहिली संविधानिक घटनादुरूस्ती केली. अशा रितीने समाजमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आण्णयाचे काम काँग्रेस सरकारने केले होते."

श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा इशारा
स्वंतत्रसेनानी व तत्तकालीन संविधानसभेचे सदस्य असणाऱ्या श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी पहिल्या घटनादुरूस्ती दरम्यान दिलेल्या इशाऱ्याला उद्धृत करतनिर्मला सीताराम म्हणाल्या " पहिली घटनादुरूस्ती ज्यावेळेस संसदेच्या समोर ठेवण्यात आली, त्यावेळेस बरेच वाद प्रतिवाद करण्यात आले. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी त्यावेळेस म्हटले होते की " तुम्ही कायद्याची निर्मिती करून, राज्यघटना तयार केल्याचा दावा करू शकता, परंतु अशा पद्धधतीची घटनादुरूस्त करत तुम्ही आता या संविधानाचे अवमूवल्यन करीत आहात. ही घटना लिहीण्यासाठी तुम्ही या देशातील जनतेवर विश्वास ठेवला, परंतु आता तुम्हीच त्यांच्या पाठीत खंजीर खूपसत आहात." दरभंगा संस्थानाचे महाराज कामेश्वर सिंह यांनी देखील यावर प्रतिक्रीया देत म्हटले होते की " संविधानात असे बदल करणे अत्यंत अयोग्य आहे. अशा कृत्यांमुळे न्यायव्यवस्थेला बगल देऊन, राज्यघटनेची पूर्ण अवहेलना करणे चुकीचे आहे"
 
 
 
Powered By Sangraha 9.0