मी बिस्मिल्ला म्हणेन आणि.... मजूराची ऑन कॅमेरा योगींना धमकी

16 Dec 2024 19:28:23
 
 Yogi Adityanath
 
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ संदर्भात एका डिजिटल माद्यमाच्या युट्यूब चॅनेलवर प्रकाशित झालेल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने ‘मी बिस्मिल्ला म्हणेन आणि योगींचा बळी देईन’, अशी ऑन कॅमेरा वक्तव्य करत धमकी दिली आहे. १३ डिसेंबर २०२४ रोजी हे प्रकरण घडले असल्याचे वृत्त आहे. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात बेजबाबदार वक्तव्य केले आहे. याप्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
योगी आदित्यनाथ सरकारच्या धोरणांवर स्थलांतरीत मजुरांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी बोलत असताना एका मजूराने आपली पातळी सोडली आहे. ते म्हणाले की, मी बिस्मिल्ला म्हणेन आणि योगींचा त्याग करेन अशी धमकीवजा वक्तव्य केले. त पुढे म्हणाले की, आम्ही खुलेआम म्हशीचे मांस कापत आहोत, अजान खुलेआम सुरू आहे. पुढे तो म्हणाला की, आम्ही खुलेआम म्हशीचे मांस खात आहोत. त्याच्या आईने एका मुस्लिमांशी लग्न केले आहे. तो म्हणाला की, त्यांच्या आईने एका मुस्लिम व्यक्तीशी निकाह केला आहे. ते म्हणतात की मुस्लिमांना याठिकाणाहून हकलवून द्या. जर तो पुढे आला तर मी बिस्मिल्ला म्हणेन आणि त्यांची हत्या करेल, असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
 
 
त्यानंतर त्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे गुणगान गाण्यास कौतुक केले. तो म्हणाला, आमची बहीण बंगालमध्ये चांगले काम करत आहे. मात्र, काही कार्यकर्त्यांनी ममता सरकारवर ममता सरकारवर टीकेचे बाण सोडले होते. बांगलादेशात रोजगार असता तर दिल्ली येथे का आलो असतो? असा सवाल त्याने उपस्थित केला. दरम्यान यावेळी एका मजूराने बांगलादेशात २८ जिल्हे आहेत, पण मोठ्य कंपन्या नाहीत, रोजगारासाठी १४०० किलोमीटर चालत दिल्ली येथे जावे लागले होते, असे काहींनी सांगितले.
 
 
Powered By Sangraha 9.0