तबल्याचा नाद हरपला! तबलावादक झाकीर हुसेन काळाच्या पडद्याआड

15 Dec 2024 23:14:21

Zakir Hussain passes away
 
मुंबई : उस्ताद अल्लाह राखा खान यांचे पुत्र झाकीर हुसेन यांचे रविवारी रात्री अमेरिकेत १५ डिसेंबर २०२४ रोजी निधन झाले आहे. संगीत विश्वामध्ये तबला वादनाची एक ओळख आहे. झाकीर हुसेन यांच्यामुळे तबलावादन क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. सॅन फ्रान्सिस्को येथून रविवारी उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाची धक्कादायक घटना समोर आली आहे.
 
अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील एका रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यांना रक्तदाबाची समस्या निर्माण झाली होती. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. झाकीर हुसेन यांनी आपले वडील उस्ताद उल्ल रखा खान यांच्याकडून तबलावादनाचे प्रशिक्षण घेतले होते. यानंतर झाकीर हुसेन यांनी वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला होता. एकूण ६२ वर्षे झाकीर हुसेन आणि तबला एक समीकरण झाले होते.
 
झाकीर हुसेन यांचा जन्म हा ९ मार्च १९५१ रोजी मुंबई येथे झाला होता. झाकीर हुसेन हे वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी वडिलांकडून पखवाज वाजवायला शिकले होते. त्यांचे शालेय शिक्षण हे सेंट झेवियर्स महाविद्यालयातून झाले होते. त्यानंतर त्यांनी १९७३ साली  लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड नावाचा त्यांचा पहिला अल्बल लाँच केला. त्यांच्या या अल्बमचे लोकांनी आणि चाहत्यांनी कौतुक केले होते.
 
त्यांनी तबला वादनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले असून उस्ताद यांना १९९२ मध्ये द प्लॅनेट ड्रम आणि २००९ मध्ये ग्लोबल ड्रम प्रोजेक्टसाठी संगीत जगतातील सर्वात मोठा ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यानंतर २०२४ नंतर त्यांना तीन वेगवेगळ्या संगीत अल्बमसाठी एकाच वेळी तीन ग्रॅमी पुरस्काराने गौरविले. १९७८ मध्ये त्यांनी कथ्थक नृत्यांगना अँटोनिया मिनिकोलाशी विवाह केला. त्यांना अनिसा कुरेशी आणि इसाबेला कुरेशी या दोन मुली आहेत.
 
झाकीर हुसेन यांनी १९८३ मध्ये हीट अँड डस्ट चित्रपटात अभिनय केला केला. यानंतर १९८८ मध्ये द परफेक्ट मर्डर, १९९२ साली मिस बिटीज चाइल्डर्स आणि १९९८ साली त्यांनी साज या सिनेमांमध्ये काम केले होते.
 
Powered By Sangraha 9.0