देवेंद्र फडणवीस ३.० मंत्रिमंडळात भाकरी फिरली, २५ नवीन चेहरे कॅबिनेट मंत्रिपदी

15 Dec 2024 20:53:56
 
Devendra Fadnavis 3.0 cabinet
 
नागपूर : देवेंद्र फडणवीस ३.० मंत्रिमंडळात (Devendra Fadnavis 3.0 cabinet) एकूण २५ नवनिर्वाचितांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. यामुळे आता महायुतीच्या देवेंद्र फडणवीस ३.० मंत्रिमंडळात भाकरी फिरवली असे म्हणता येईल. कारण आता महायुतीतील एकूण २५ नवनिर्वाचित आमदारांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. 
 
एकूण २५ नवनिर्वाचित आमदारांना कॅबिनेट मंत्रिपद
 
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना जे मंत्री होते आता त्यांच्याहून वेगळी नावे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडलात आली आहेत. एकूण २५ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. ज्यात चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे. पंकजा मुंडे, गणेश नाईक, जयकुमार रावल, आशीष शेलार, दत्तात्रेय भरणे, शिवेंद्रराजे भोसले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगवले, मकरंद पाटील, नितेश राणे, अशोक उइकेमाणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे, नरहरी झिरवाळ, आशीष जैस्वाल, पंकज भोयर, मेघना बोर्डिकर, इंद्रनील नाइक, संजय सावकारे, आकाश फुंडकर, बाबासाहेब पाटील, प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ या नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
 
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळाच्या एकूण फॉर्म्युल्यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, महायुतीतील एकूण मंत्र्यांना संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी अडीच वर्षांचा मंत्रिपदाचा कालावधी असणार आहे. यामुळे महायुतीतील एकूण आमदारांना मंत्रिपदाचा लाभ मिळणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0