देवेंद्र फडणवीस ३.० मंत्रिमंडळात जातीय सलोखा, प्रत्येक समाजातील आमदारास कॅबिनेट मंत्रिपद

15 Dec 2024 19:58:32
 
Devendra Fadnavis 3.0 cabinet
 
नागपूर : महायुतीला विक्रमी बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ५ डिसेंबर २०२४ रोजी शपथ घेतली. त्याचसोबत राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनीही शपथ घेत सत्ता स्थापन केली. त्यानंतर १५ डिसेंबर २०२४ रोजी महायुतीच्या एकूण ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेत कारभार स्वीकारला आहे. यामध्ये जातीय सलोखा जपत कोणताही भेदभाव न करता मंत्रिपदे दिली आहेत.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुर येथे झाला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारावेळी महायुतीच्या ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपचे एकूण १९ आमदार आहेत. तर शिवसेनेचे एकूण ११ आमदार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे १९ आमदारांनी शपथ घेतली आहे.
 
दरम्यान या मंत्रिमंडळात भौगोलिक, आर्थिक दुर्भल परिस्थिती असलेल्या आमदारांना आणि जातीय सलोखा जपण्यात आल्याची प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0