मी चंद्रशेखर बावनकुळे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की...., चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

15 Dec 2024 18:03:35
 
Chandrashekhar Bawankule
 
नागपूर : नागपूर राजभवन येथे दि : १५ डिसेंबर २०२४ रोजी महायुतीच्या आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. काही दिवसांआधी ५ डिसेंबर २०२४ रोजी राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली होती. अशातच आता भाजपचे सदस्य आणि नवनिर्वाचित मंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच शपथ घेतली आहे.
 
चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे सदस्य म्हणून सुरूवातीला कामगिरी केली होती. त्यांनी भाजपात एकूण ३० वर्षे प्रदेशाध्यक्ष पदी कारभार स्वीकारला असून त्यांच्या कामाचा एकूण प्रवास हा खालीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे.
 
चंद्रशेखर बावनुकुळे यांचा राजकीय प्रवास  
 
भारतीय जनता पक्षाचे सदस्य ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष असा बावनकुळेंचा ३० वर्षांचा राजकीय प्रवास आहे. भाजपाच्या जिल्हा ते प्रदेश असा संघटनात्मक पातळीवरील सर्वच पदांचा बावनकुळे यांना अनुभव आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये कामठी-मौदा विधानसभा मतदारसंघातून विधानसभा सदस्य म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला आहे.
 
जानेवारी २०२२ - विधान परिषद सदस्य (नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था) २००४-२००९, २००९ - २०१४ , २०१४ -२०१९ विधानसभा सदस्य (आमदार) (विधीमंडळ पंचायत राज, सार्वजनिक उपक्रम व ग्रंथालय समिती सदस्य) म्हणून कारभार स्वीकारला होता. याचदरम्यान त्यांनी ऊर्जामंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता. राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मंत्री तथा पालकमंत्री, नागपूर जिल्ह्याचे मंत्रिपद म्हणून आपली भूमिका बजावली. त्यानंतर १९९७ - २००२ जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम केले होते. २००२ - २००४ मध्ये जिल्हा परिषद भाजपा गटनेता म्हणून त्यांनी भूमिका स्वीकारली होती. शिवसेना तथा आरोग्य व बांधकाम समितीचे सदस्य म्हणून त्यांनी कारभार स्वीकारला होता. तसेच त्यांनी भाजपसाठी एकूण ३० वर्षांचे योगदानही दिले होते.
 
भारतीय जनता पक्षासाठी ३० वर्षांचे योगदान
 
१९९५ पासून त्यांनी भाजपच्या पक्षाचे सक्रीय सदस्य म्हणून जबाबदारी हाती घेतली होती. तसेच राज्य गाव जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यानंतर १९९९ - २००१ साली नागपूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचे महामंत्री म्हणून आपले काम सुरू केले होते. २००२ साली संघटन प्रमुख भारतीय जनता पक्ष कामठी क्षेत्राची धुरा हाती घेतली.
 
२०११ ते २०१४ मध्ये भारतीय जनता पक्ष नागपूर जिल्ह्याचा पदभार स्वीकारला होता. त्यानंतर २०१४ ते २०१७ या वर्षात भाजप प्रदेश सचिव, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश पदाचा मान राखत पक्षासाठी काम केले. २०२१ ते २०२२ सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश (महाराष्ट्रातील १६ लोकसभा क्षेत्र प्रवास कार्यक्रम प्रभारी) १२ ऑगस्ट २०२२ पासून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 
 
इतर सामाजिक कार्य
 
१९८८-१९९५ छत्रपती सेना विद्यार्थी संघटनेत कार्य म्हणून सक्रीय होते. तसेच १९९०- १९९५ साली अखिल महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त बेरोजगार समिती संस्थापक अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला होता. कोराडी वीज प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासाठी व पुनर्वसनासाठी सातत्याने लढा व आंदोलने करण्याचे काम बावनकुळे यांनी केले होते. यामुळे त्यांना वीज प्रकल्पग्रस्त आंदोलनात अटकही झाली होती. श्री जगदंबा लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून काम केले. महालक्ष्मी जगदंबा बिगर शेती सहकारी संस्था अध्यक्ष म्हणून श्री क्षेत्र व पर्यटन क्षेत्र विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
 
 
Powered By Sangraha 9.0