मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ५ डिसेंबर २०२४ रोजी शपथविधी झाला. त्यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली होती. मात्र यानंतर आता मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. मात्र आता त्याच मंत्रिमंडळात कोणाला स्थान देण्यात येणार आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच कोणाच्या वाट्याला काणते पद येणार? असा सवाल उपस्थित होत आहे. अशातच १५ डिसेंबर २०२४ रोजी मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी नागपूर येथे सोहळा पार पडणार आहे. अशातच आता मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी ३९ आमदारांना संपर्क करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
१५ डिसेंबर २०२४ रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या सोहळ्यासाठी आतापर्यंत महायुतीच्या ३९ आमदारांना फोन करण्यात आला आहे. ज्यामध्ये भाजप २०, शिवसेना गट १० तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ९ आमदारांचा समावेश असल्याचे समजते. त्यापैकी आता भाजप उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे देण्यात आली आहेत.
भाजप आमदारांची यादी
गिऱीश महाजन, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, रविंद्र सिहं भोसले, जयकुमार रावल, नितेश राणे, पंकज भोईल, गणेश नाईक, मेघना बोर्डीकर, जयकुमार, ओशोक उईके, संजय सावकारे, अतुल सावे, पंकज भोईर, माधुरी मिसाळ, आकाश फुंडकर यांचा , समावेश आहे.
शिवसेना आमदार यादी
एकनाथ शिंदे, संजय शिरसाठ, गुलाबराव पाटील. उदय सामंत, दादा भुसे, योगेश कदम, प्रकाश आबिटकर, प्रताप सरनाईक, आशिष जैस्वाल यांचा यामध्ये समावेश होतो.
तसेच यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या एकूण ९ आमदारांचाही समावेश आहे. यामध्ये नरहीर झिरवळकर, हसन मुश्रीफ, अनिल भोईदार पाटील, आदिती पाटील. बाबासाहेब पाटील, दत्ता भरणे, सना मलिक, इंद्रनील नाईक आणि धनंजय मुंडे या आमदारांचे नाव यादीत आहे.
राष्ट्रवादीच्या आमदारांची यादी
नरहरी झिरवाळ, हसन मुश्रीफ, अनिल भाईदास पाटील, आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्ता भरणे, सना मलिक, इंद्रनील नाईक, धनंजय मुंडे यांचा समावेश आहे.