महाराष्ट्र काँग्रेसला धक्का! नाना पटोले राजीनामा देण्याच्या तयारीत!

13 Dec 2024 15:13:17
 
Nana Patole
 
मुंबई : (Nana Patole) "मला पदमुक्त करा", अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोलेंनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे केल्याचे वृत्त समोर येत आहे. "प्रदेशाध्यक्ष पद नको, प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त करा", असे नाना पटोलेंनी म्हटल्याचे बोलले जात आहे.
 
विधानसभा निवडणूकीतील निकालानंतर नाना पटोलेंच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर पटोलेंकडून राजीनामा सुद्धा देण्यात आला होता. त्यामुळे निवडणूकीतील पराभवानंतर आता पुन्हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करण्याची मागणी नाना पटोलेंकडून केल्याचे बोलले जात आहे. नाना पटोलेंनी पदमुक्त करण्याबाबत ईमेल द्वारे पत्र पाठवून विनंती केल्याची माहिती आहे. तसेच नवीन प्रदेशाध्यक्ष पदासाठी विश्वजीत कदम ,सतेज पाटील, यशोमती ठाकुर अशी नावे सध्या चर्चेत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0