अखेर, कुर्ला स्टेशनपर्यत बस सेवा पूर्ववत

13 Dec 2024 18:48:11
Bus

मुंबई : अखेर, कुर्ला ( Kurla ) स्टेशनपर्यंत बस सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. कुर्ला स्टेशन पर्यंत बस सेवा पूर्ववत करण्याबाबत मागील ३ दिवसापासून चुकीची माहिती देत बस सेवा स्थगित करत सामान्य प्रवाश्यांना वेठीस धरणारे वरिष्ठ वाहतुक अधिकारी लक्ष्मण महाले यांची चौकशी करत कारवाई करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी बेस्ट महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांसकडे केली आहे.

अनिल गलगली यांच्या मते अप्रत्यक्षपणे कोणतेही ठोस कारण नसतानाही बेस्ट बस मंगळवार पासून बंद होती. यामुळे प्रवाशांना पायपीट करावी लागत आहे. कुर्ला पोलिसांबाबत चुकीची माहिती देण्यात आली प्रत्यक्षात प्रत्येक दिवशी कुर्ला पोलीस तर्फे बस सेवा सुरु करण्याबाबत विचारणा करण्यात येत होती. लक्ष्मण महाले आपल्या स्तरावर अयोग्य निर्णय घेत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. उलट कुर्ला पोलीस तर्फे वारंवार विचारणा करुनही बेस्ट कोणताही निर्णय न घेत असल्याने कुर्ला स्टेशन पर्यत बस सेवा स्थगित केली.

याबाबत लक्ष्मण महाले यांचे नेमके म्हणणे काय आहे? त्यांनी जो निर्णय घेतला आहे त्याची चौकशी करणे आवश्यक आहे. मागील ३ दिवसापासून प्रवाशांना वेठीस धरल्याबाबत योग्य चौकशी करत कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत गलगली यांनी व्यक्त केले आहे.

Powered By Sangraha 9.0