हैदराबाद : तेलंगणा येथे राज्यत्वाच्या आंदोलनादरम्यान 'तेलंगणा थल्ली' (Telangana Thalli) या देवीच्या पुतळ्याचा रंग बदलण्यात आल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. तेलंगणा थल्लीच्या सचिवालयात देवीच्या एका नवीन पुतळ्याचे आनावर करण्यात आले आहे. याआधी असलेली तेलंगणा थल्ली देवी ही हिंदू सणांशी संस्कृती जपणारी आहे. तर संबंधित नवीन पुतळ्यात त्यांनी तेलंगणाची असलेली मुख्य ओळख लपवण्याचा प्रयत्न केला आहे. सोमवारी ९ डिसेंबर २०२४ रोजी तेलंगणा सचिवालयाबाहेर हा पुतळा बसवण्यात आला असल्याचे सांगितले. काँग्रेस सरकारचे प्रमुख रेवंत रेड्डी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
संबंधित पुतळ्यामध्ये काँग्रेस सरकारने मोठ्या प्रामाणात बदल केले आहेत. देवीच्या मूर्तीचा रंग बदलण्यात आल्याचे दिसून येत आहे. देवाच्या मूर्तीला हिरवा रंग देण्यात आला आहे. मूर्तीवरील दागिणेही काढण्यात आले आहे. डाव्या हातात असलेले मक्याचे कनिस आता उजव्या हातात ठेवण्यात आल्याचे दिसते. तसेच हतात असलेले भांडे काढण्यात आले आहे. तसेच प्रमुख हिंदू सणाला स्थान नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर देवीच्या डोक्यावरील मुकूटही काढण्यात आले आहे. तसेच साडीच्या रंगासह देवीच्या बांगड्यांचा रंग बदलून हिरवा रंग देण्यात आला असल्याचे समजते.
तेलंगणा येथे हा सण नवरात्रीदरम्यान साजरा केला जातो. या उत्सवामध्ये फुलांचीही पूजा करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. एकूणच, तेलंगणा येथे थल्ली हिंदू देवी म्हणून दाखवल्या गेल्या. राज्याच्या स्थापनेनंतर तेलंगणा थल्ली ही एक प्रमुख ओळख म्हणून ओळखली जात होती. मात्र काँग्रेस सरकार तेलंगणा येथे येताच अनेक महिन्यांपासून काही देशविघातक घटना घडल्याचे दिसून येते.