'ब्रेन रॉट' शब्द ठरला ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर

13 Dec 2024 16:20:03
 
woty
 
मुंबई : दरवर्षी ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’ (OUP) वर्षाच्या शेवटी एका शब्दाची त्या वर्षात सगळ्यात वापरला जाणाऱ्या शब्दाची किंवा त्या वर्षी विशेष ठरलेल्या शब्दाची ‘ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर’ (oxford word of the year) म्हणून निवड करते. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने २०२४ चा ‘ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर’ म्हणून 'ब्रेन रॉट' (Brain rot) या शब्दाची घोषणा केली आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने संकलित केलेल्या सहा शब्दांमधून या शब्दाची निवड करण्यात आली आहे.
 
'ब्रेन रॉट' (Brain rot) या शब्दाचा अर्थ काय?
 
'ब्रेन रॉट' हा शब्द समाज माध्यमांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांशी संबंधित आहे. निकृष्ट दर्जाचा समाज माध्यमांवर सतत पाहिल्यामुळे त्याचे व्यसन लागणे आणि त्यातून मग मानसिक ताणतणाव आणि मानसिक थकवा निर्माण होणे म्हणजे ‘ब्रेन रॉटींग’ होणे. माणसं तंत्रज्ञानाच्या कशी आहारी जात आहेत याचे वर्णन ‘ब्रेन रॉट’ हा शब्द करतो.
Powered By Sangraha 9.0