बांगलादेशातील हिंसाचार आयएसआय आणि जमात-ए-इस्लामीचे नापाक षडयंत्र

11 Dec 2024 18:25:24

Uttarakhand Waqf Board on Bangladesh

 मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Uttarakhand Waqf Board on Bangladesh)
बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाच्या लोकांनी हरिद्वार येथील कालियार साबीर पाक दर्गा येथे चादर चढवून शांततेसाठी प्रार्थना केल्याचे निदर्शनास आले आहे. मुस्लिम धर्मगुरूंनी यावेळी बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचाराचा तीव्र निषेध केला, तर केंद्र सरकारकडे बांगलादेशवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान बांगलादेशमध्ये जे काही घडत आहे त्यामागे आयएसआय आणि जमात-ए-इस्लामीचे नापाक षडयंत्र असल्याचे उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी म्हटले आहे.

हे वाचलंत का? : कार्यकर्त्यांचा नादच खुळा! यावेळी तीन ठिकाणी झळकले 'अफजलखान वधा'चे भव्य फलक

पुढे ते म्हणाले की, बांगलादेशातील लोकांना धार्मिक द्वेषाचा सामना करावा लागत आहे. मंदिरे पाडली जात आहेत, महिलांची असुरक्षिता वाढली आहे. तिथे लोकशाहीची हत्या झाली असू अत्याचाराच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून आमचा वसुधैव कुटुंबकमवर विश्वास आहे. यामुळेच आज बांगलादेशातील हिंदूंसाठी मुस्लिम धर्मगुरू आणि मुस्लिम समाजातील लोक आवाज उठवत आहेत. जगासाठी हा मोठा संदेश आहे.


कलियर साबिर पाक

केंद्र सरकारचा उल्लेख करत शम्स म्हणाले की, देश पंतप्रधान मोदींच्या मजबूत हातात आहे. सरकार या प्रकरणाबाबत अत्यंत गंभीर असून परराष्ट्र मंत्री, गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री यांनीही या विषयावर आपले मत व्यक्त केले आहे. पाकिस्तानच्या तावडीत अडकलेल्या बांगलादेशींनी बाहेर पडून शांततेचे वातावरण निर्माण करावे, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.


Powered By Sangraha 9.0