कुर्ला बस अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर! आमदार मंगलप्रभात लोढा यांनी दिली माहिती

10 Dec 2024 12:30:32
 
lodha
 
मुंबई : (kurla) कुर्ला येथे सोमवारी ९ डिसेंबर रोजी झालेल्या भीषण बेस्ट बस अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखाची मदत जाहीर केल्याचे मलबार हिल मतदारसंघाचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करत सांगितले आहे. तसेच त्यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण करत अपघाताविषयी शोक व्यक्त केला आहे.
 
पोस्टमध्ये आमदार मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे की, "कुर्ला येथील बेस्ट बस अपघातामुळे झालेल्या दुर्दैवी हानीने मन व्यथित झाले आहे. अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीसजी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची मदत जाहीर केली असून, जखमींच्या उपचाराचा खर्च हा मुंबई महापालिका व बेस्ट महामंडळाकडून करण्यात येईल असे सांगितले आहे. सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत."
 
 
Powered By Sangraha 9.0