"५३ कोटी द्या, ईव्हीएम हॅक करू..." काँग्रेसच्या घोटाळेबाज एकस्पर्टचा पर्दाफाश
01 Dec 2024 17:25:17
मुंबई(EVMTampering): महाराष्ट्रामधील विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी आपला पराभव मान्य करायचाच नाही असा चंग बांधला आहे. पराभवाच्या धक्क्यानंतर, ईव्हीएम वर खापर फोडून स्व:ता नामनिरळे होण्याचा प्रकार आघाडीतल्या नेत्यांनी सुरू केले आहे. अशातच आता एका कथित स्टींग ऑपरेशनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सय्यद शुजा या युवकाने असा दावा केला आहे की ईव्हीएम मशिन हॅक करून कुठल्यातरी एका पक्षाच्या पारड्यात तो जास्त मतं टाकू शकतो. या कामासाठी त्याने ५३ कोटी रूपयांची मागणी केली आहे.
सय्यद शुजा हा एक अत्यंत घोटाळेबाज मनुष्य असल्याचे वृत्त माध्यमांच्या हाती आले आहे. भारतातील निवडणूक आयोगाने सदर इसमाच्या विरोधात दिल्ली पोलिसांना तक्रार दाखल करण्याचे निर्दश सुद्धा केले होते. सय्यद शुजाने गणितात पीएचडी आणि संगणक शास्त्रात बीटेक पदवी असल्याचा दावा केला असला तरीही, त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीची कुठल्याही नोंद अद्याप सापडलेली नाही. ईव्हीएम हॅकींग करून निवडणुका जिंकता येतात अशा अर्थाचे दावे शुजा याने वारंवार केले आहे. मध्यंतरी, एका फोटो मध्ये सय्यद शुजा काँग्रेसचे कपिल सिब्बल आणि सॅम पित्रोदा यांच्यासोबत दिसला होता. शुजाचे काँग्रेस पक्षात मजबूत संबंध असल्याचे सांगितले जाते. स्व:ताला सायबर एक्सपर्ट म्हणवून घेणारा सय्यद शुजा ईव्हीएम हॅकींग बद्दलचे कुठलेही पुरावे अद्याप सादर करू शकला नाही. मविआच्या नव्या कूटनितीनुसार काँग्रेसचे कार्यकर्ते, ‘पत्रकार’ आणि यूट्यूबर्स सदर व्यक्तीचा व्हिडिओ शेअर करत आहेत जो ईव्हीएम फिक्सिंगचा अजब दावा करीत आहे. अर्थात या दाव्याला कुठल्याही प्रकराचा आधार नसला तरी, जाणीवपूर्वक असत्य कथनाक पसरवण्याचे काम काँग्रेसच्या लोकांकडून केले जात आहे.