विमानाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पाहा...

01 Dec 2024 15:16:44
Airoplane

पुद्दुचेरी : 'फेंगल' चक्रीवादळाने डोकेदुखी वाढवली आहे. उत्तरी तमिळनाडू, पुद्दुचेरीच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. या चक्रीवादाळाचा हवाई वाहतूकीलाही मोठा धक्का बसला आहे. रविवारी १ डिसेंबर रोजी फेंगल चक्रीवादळामुळे पुद्दुचेरीमध्ये चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीव्र हवामानामुळे नाट्यमय दृश्य निर्माण झाले. चेन्नई विमानतळावर भयंकर वादळामुळे प्रवासी विमान ( Airoplane ) हवेतच डगमगले, यानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच या घटनेनंतर तातडीने वाहतूक अधिका-यांनी प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. याचा धडकी भरवणारा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

बंगालच्या उपसागरातून उगम पावलेले ‘फेंगल’ वादळ हे शनिवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पुद्दुचेरीतील कराईकल आणि तामिळनाडूतील महाबलीपुरम दरम्यानच्या किनारपट्टीवर धडकले. चेन्नईत मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. रविवारी चक्रीवादळाचा दुष्परिणाम हवामानावर झाल्याने इंडिगो यांचे प्रवासी विमान शहराच्या विमानतळावर उतरण्यासाठी संघर्ष करत होते. या विमानाच्या पायलटने विमान विमानतळावर उतरवण्याचा प्रयत्न केला, परंतु हवेचा जोर पाहता विमान डगमगले. यानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ते विमान जवळजवळ अपघाताच्या परिस्थितीतून बाहेर पडले आहे. या विमानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झालेला दिसून आला.

Powered By Sangraha 9.0