अविनाश ब्राह्मणकर जनतेच्या मनातील आमदार! साकोली मतदारसंघात बॅनरबाजीची चर्चा

01 Dec 2024 19:06:50

 Sakoli constituency
 
साकोली : काँग्रेस नेते नाना पटोले आणि महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्यात साकोली विधानसभा मतदारसंघात लढत झाली होती. मात्र या लढतीत नाना पटोले हे पराभवाच्या काही अंशी दूर होते. केवळ २०८ मतांनी ब्राह्मणकर यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. मात्र ब्राह्मणकर यांनी भरभरून मते मिळवत मतदारांची मने जिंकली असून मतदारांनी अविनाश ब्राह्मणकर यांची बॅनरबाजी केली आहे.
 
नुकताच आता सोशल मीडियावर अविनाश ब्राह्मणकर यांचा एक बॅनर व्हायरल होत आहे. बॅनरवर मतदारांच्या मनातील आमदार अशा आशयाची बॅनरबाजी करत मतदारांनी आनंद व्यक्त केला आहे. अविनाश ब्राह्मणकर यांचा पराभव झाला असला तरीही मतदारांनी त्यांची बॅनरबाजी केली आहे.
 
साकोली विधानसभेतील मायबाप जनतेने भरभरून मताधिक्य दिल्याने मतदारांच्या मनातील आमदार अशा आशयाचे बॅनर हे साकोली येथे लावण्यात आल्याचे फोटो व्हायरल होत आहे. साकोली विधानसभा मतदारसंघात नाना पटोले आणि अविनाश ब्राह्मणकर यांच्यात लढत झाली होती. यावेळी नाना पटोले हे जरी विजयी झाले असले तरीही ब्राह्मणकर यांचा हा एक निसटता विजय म्हणावा लागेल.
 
 
Powered By Sangraha 9.0