मंत्री रविंद्र चव्हाण यांचा पालघर ते सिंधुदुर्ग व्हाया डोंबिवली झंझावाती दौरा

09 Nov 2024 16:02:18
Ravindra Chavan

डोंबिवली : सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण ( Ravindra Chavan ) यांचा सोमवार, दि. ४ नोव्हेंबर रोजीपासून पालघर ते सिंधुदुर्ग असा झंझावाती प्रचार दौरा सुरू असून त्यांच्या प्रचाराला सर्वत्र प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आबालवृद्ध नागरिक त्यांचे मनोमन स्वागत करत असून ‘अभी नही तो कभी नही’ म्हणत कमळ फुलणार असा आशीर्वाद देत आहेत.

चव्हाण यांच्या दौर्‍याला पालघर, वसई, वाडा, भिवंडी, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, पाली, महाड, रायगड, कर्जत, चिपळूण, रत्नागिरी, लांजा, कुडाळ, सिंधुदुर्ग या सर्व ठिकाणी उदंड प्रतिसाद मिळत आहे. मतदारांमध्येही प्रचंड उत्साह असल्याचे जाणवत आहे, असे ठिकठिकाणी दिसून आल्याचे मंत्री चव्हाण यांनी सांगितले. खासदार नारायण राणे, मंत्री उदय सामंत, खासदार सुनिल तटकरे, अदिती तटकरे यांसह प्रशांत ठाकूर, गणेश नाईक आदी सर्व नेतेमंडळी कार्यरत असून कोकणात बहुतांशी ठिकाणी महायुतीला यश मिळणार असल्याचे आशीर्वाद नागरिकांनी दिले.

Powered By Sangraha 9.0