राहुल गांधींनी केला संविधानाचा अवमान! स्वतः वडेट्टीवारांनीच दिला पुरावा

08 Nov 2024 17:33:48
 
Rahul gandhi
 
नागपूर : ( Rahul Gandhi ) लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नागपूरमधील संविधान सन्मान संमेलनात लाल रंगाचे मुखपृष्ठ असलेली पुस्तिका संविधानाची प्रत म्हणून दाखवली होती. ह्या लाल रंगाच्या पुस्तिकेवर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असे लिहिलेले असून पुस्तिकेमधील उर्वरित पाने कोरी होती. अश्या प्रकारच्या पुस्तिकेचा राहुल गांधींनी संविधानाची प्रत असा उल्लेख केल्याने भारताच्या मूळ संविधानाचा तसेच घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला आहे.
 
 
 
"राहुल गांधी यांच्या हातात लाल रंगाचे संविधान आहे. भारतीय संविधान निळ्या रंगाचे असताना ते प्रत्येक सभांमधून आपल्या हातात लाल रंगाचे संविधान लोकांना दाखवत असतात. सभेत त्यांच्या आजूबाजूला अराजकवादी आणि शहरी नक्षलवादी बसलेले असतात. राहुल गांधी कट्टर डाव्या विचारांकडे झुकलेले आहेत, याचेच हे निदर्शक आहे," अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
 
या टीकेला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर देत राहुल गांधींनी केलेल्या कृत्याचा पुरावाच दिलेला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणाले, "संविधान सन्मान संमेलनात आलेल्या मान्यवरांना नोटपॅड, पेन दिले जाते. याच नोटपॅडचे व्हिडिओ बनवून थिल्लर आरोप करणे ह्यात दूरपर्यंत बुद्धीचा वापर दिसत नाही," असे वडेट्टीवार म्हणाले. यातून हेच स्पष्ट होते की, एका साध्या नोटपॅडला संविधानाचे नाव देऊन राहुल गांधींनी पुन्हा एकदा भारताच्या मूळ संविधानाचा अपमान केला आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0