आदिवासी सवलतींचा लाभ घेत ITI मध्ये शिकणाऱ्या धर्मांतरीत विद्यार्थ्यांवर होणार कारवाई

07 Nov 2024 15:53:20

lodha
 
मुंबई : ( ITI )काही विद्यार्थी आदिवासी समाजातून इतर धर्मात धर्मांतरण करून देखील आदिवासींसाठी असलेल्या सवलतींचा लाभ घेत असल्याचे २०२३ सालच्या आयटीआय प्रवेश प्रक्रियेदरम्यान निदर्शनास आले होते. याच पार्श्वभूमीवर, कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हिवाळी अधिवेशनात सखोल चौकशीचे निर्देश दिले होते.
 
या चौकशीसाठी गठीत समितीने आपल्या अहवालात सांगितले आहे की, अनुसूचित जमातीतील १३,८५८ विद्यार्थ्यांपैकी २५७ विद्यार्थ्यांनी हिंदू धर्माव्यतिरिक्त इतर धर्म नोंदवलेला आहे.
 
या विद्यार्थ्यांवर आवश्यक ती कारवाई करण्याचे कौशल्य विकास विभागाने निश्चित केले असून, अहवाल पुढील कार्यवाहीसाठी आदिवासी विकास विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. यासोबतच आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि चालीरीतींचे संवर्धन करण्यासाठी समितीने विविध उपाययोजना सुचवल्या असून, त्याही आदिवासी विकास विभागाकडे पाठवण्यात आल्या आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0